google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दक्षता हॉस्पीटलने सेवाभावी वृत्ती जपली - ना. प्रकाश आबिटकर आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांची दक्षता हॉस्पीटलला सदिच्छा भेट

Breaking News

दक्षता हॉस्पीटलने सेवाभावी वृत्ती जपली - ना. प्रकाश आबिटकर आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांची दक्षता हॉस्पीटलला सदिच्छा भेट

दक्षता हॉस्पीटलने सेवाभावी वृत्ती जपली -




ना. प्रकाश आबिटकर आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांची दक्षता हॉस्पीटलला सदिच्छा भेट

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी):- दक्षता हॉस्पीटलचे सर्व डॉक्टर्स सेवाभावी वृत्तीने काम करत आहेत याचा मनस्वी आनंद आहे. 

हॉस्पीटलबद्दल समाजात विश्वासार्हता असून हॉस्पीटलने सेवाभावी वृत्ती जपली आहे. त्यामुळे हॉस्पिटलचा अभिमान असून दक्षता हॉस्पीटलसारख्या हॉस्पिटलची गरज समाजाला आहे.

 मोठमोठ्या शहरात कॅथलॅबची सुविधा असते. तीच सुविधा सांगोल्यात उपलब्ध झाली आहे. त्यामुळे रुग्णांची मोठी सोय झाली आहे. मोठ्या मोठ्या कथलब असतात. 

तीच सोय सांगोल्यात झाली असून शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी तसेच आरोग्याची सुविधा चांगली करण्यासाठी सर्वांनी मिळून गतिमान काम करूया अशी अपेक्षा आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केली.

सांगोला शहरातील रुग्णांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या दक्षता हॉस्पीटलला राज्याचे आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी काल शुक्रवार दि.१३ जून रोजी सदिच्छा भेट दिली.

ना.प्रकाश आबिटकर यांनी दक्षता हॉस्पीटलची पाहणी करुन रुग्णांची विचारपूस केली. त्याप्रमाणे महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या कामकाजाची माहिती घेत हॉस्पीटलच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले.

 यावेळी मा. आमदार शहाजीबापू पाटील, मा.आ.दिपकआबा साळुंखे-पाटील, सोमेश यावलकर, प्रा. संजय देशमुख, डॉ. अविनाश खांडेकर, अभिजीत नलवडे यांच्यासह हॉस्पीटलचे डॉक्टर्स, स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना मा.आ.शहाजीबापू पाटील म्हणाले, सांगोलासारख्या दुष्काळी तालुक्यात गेल्या १५ वर्षात भरधाव वेगाने मोठा क्रांतीकारी बदल झाला आहे. सांगोल्यात आता सुसज्ज हॉस्पिटल उभे राहत आहेत. दक्षता हॉस्पिटलने रुग्णांना चांगली सेवा दिली 

असून राज्याला आपल्या घरातील आरोग्य मंत्री लाभले असून तालुक्याला आरोग्याच्या सर्व सुविधा मिळण्यासाठी वाटचाल सुरु असून ट्रामा केअर एक महिन्यात सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त करत दक्षता हॉस्पीटलच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments