google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात विविध दाखल्यांसाठी १० शिबीरांचे आयोजन - तहसिलदार सांगोला संतोष कणसे

Breaking News

सांगोला तालुक्यात विविध दाखल्यांसाठी १० शिबीरांचे आयोजन - तहसिलदार सांगोला संतोष कणसे

सांगोला तालुक्यात विविध दाखल्यांसाठी १० शिबीरांचे आयोजन - तहसिलदार सांगोला संतोष कणसे 


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी)- सांगोला तालुक्यामध्ये विविध शाळा व महाविद्यालयामध्ये जात, रहिवास, उत्पन्न असे

 विविध शासकीय दाखल्यासाठी दि १७ जून, १९ जून, २० जून, २३ जून, २४ जून, २५ जून या दिवशी शिबीरांचे आयोजन केले आहे. 

अशी माहिती तहसिलदार संतोष कणसे यांनी दिली. महसूल विभागाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत हा उपक्रम सुरु केला आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून आता प्रवेश, शिष्यवृत्ती, नोकरी यासाठी विद्यार्थ्यांकडून विविध दाखल्यांची मागणी वाढते. 

दरवर्षी दाखल्यांसाठी होणारा विलंब तहसिल कार्यालयात होणारी गर्दी व वेळेवर दाखले न मिळाल्याने विद्यार्थ्यांना होणारा त्रास या पार्श्वभुमीवर शिबीर घेतली जात आहेत.

१) दि.१७.०६.२०२५ रोजी ग्रामपंचायत वर्कशेड शिवणे

२) दि.१९.०६.२०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालय घेरडी

३) दि.१९.०६.२०२५ रोजी विदयामंदीर प्रशाला सांगोला

४) दि.१९.०६.२०२५ रोजी डॉ. भाई गणपतराव देशमुख सभागृह महूद बु.

५) दि.२०.०६.२०२५ रोजी मांजरी हायस्कूल मांजरी

६) दि.२०.०६.२०२५ रोजी विदयामंदिर प्रशाला नाझरे

७) दि.२३.०६.२०२५ रोजी अंबिका मंदिर तलाठी कार्यालय जवळ सोनंद

८) दि.२४.०६.२०२५ रोजी वत्सलादेवी देसाई विदयालय जवळा

९) दि.२५.०६.२०२५ रोजी श्रीराम विदयालय हातिद

१०) दि.२५.०६.२०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालय कोळा

वरील ठिकाणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.तरी सर्व नागरिक व विद्यार्थ्यांनी सदर शिबीरांचा आवश्य लाभ घ्यावा. असे आवाहन तहसिलदार सांगोला यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments