google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज..शालार्थ आयडी , संच मान्यतेची चौकशी करा सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ पाटील

Breaking News

ब्रेकिंग न्यूज..शालार्थ आयडी , संच मान्यतेची चौकशी करा सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ पाटील

ब्रेकिंग न्यूज..शालार्थ आयडी , संच मान्यतेची चौकशी करा सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ पाटील


नागपूर प्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील शिक्षण विभागातील शालार्थ आयडी व संच मान्यतेची चौकशी करावी जिल्ह्यात देखील अनेक बोगस गिरी समोर येऊ शकते अशी शक्यता सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ पाटील यांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यातील अनेक शिक्षण संस्था चालक व त्यांच्या जवळचे नातेवाईक यांची बोगस भरती दाखवली आहे.असे खूप प्रकरण जिल्ह्यातून बाहेर पडू शकतात 

त्यामुळे शासनाने सोलापूर जिल्ह्यातील नागपूर प्रमाणे चौकशी करणे गरजेचे आहे. तसेच या प्रकरणामुळे हजारो कोटी रुपयांचा घोटाळा

 उघड होऊ शकतो शिक्षकांची मागील भरती दाखवून ५ ते १० वर्षाचे वेतन शिक्षकांचे काढण्यात आले आहे. असा धक्कादाय खुलासा देखील त्यांनी केला आहे. कर्तव्यदक्ष असणारे

 पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या प्रकरणाकडे जातीने लक्ष घालून शिक्षण विभागाची चौकशी करण्याचे आदेश द्यावे असे देखील पाटील यांनी पत्रकारांशी मोठ्या शैक्षणिक संस्था आहेत 

त्या शैक्षणिक संस्था आपल्या सोयीप्रमाणे शासनाचे नियम डावलून शिक्षक भरती करण्यात आली आहे. शालार्थ आयडी व संच मान्यता तयार करणारे रॅकेट सोलापुरात मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे.

 यात शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालक शिक्षण संचालक व शिक्षण आयुक्त या सर्वांनी संगणमताने साखळी पद्धतीने गैरप्रकार करत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

असे हरिभाऊ पाटील बोलताना म्हटले आहे. 

Post a Comment

0 Comments