धक्कादायक...शाळेच्या मधल्या सुट्टीत वाद,
आठवीच्या विद्यार्थ्याने दहावीतील विद्यार्थ्याला संपवले
राज्यातील एका विद्यालयात विद्यार्थ्याचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शाळकरी विद्यार्थ्यानेच दुसऱ्या विद्यार्थ्याचा खून केल्याच्या घटनेने खळबळ उडाली.
चाकूने केलेल्या हल्ल्यात गंभीर जमखी विद्यार्थ्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेत असतानाच विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. अहिल्यानगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
अफान उर्फ मुस्तकिम तन्वीर शेख असे मयत विद्यार्थ्याचे नाव असून तो दहावीच्या वर्गात शिकत होता. तर त्याचा खून करणारा विद्यार्थी त्याच विद्यालयात शिक्षण घेत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील दोन्ही शालेय विद्यार्थी अल्पवयीन आहेत. यातील एक विद्यार्थी आठवीच्या वर्गात शिकत होता. तर दुसरा दहावीत शिकत होता.
बुधवारी क्रिकेट खेळाच्या करणावरून दोघांमध्ये भांडण झाले. शाळेत जेवणाच्या सुट्टीमध्ये दोघांमध्ये पुन्हा भांडण सुरू झाले. हा वाद इतका वाढला की, एकाने दुसऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला.
या हल्ल्यात दहावीत शिकणारा शेख गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
खूनी विद्यार्थ्याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
0 Comments