सांगोला येथे जिल्हा परिषद भिमनगर शाळेत राजश्री शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी): जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिमनगर सांगोला येथे दिनांक 26 /6 /2025 रोजी राजश्री शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.प्रकाश बनसोडे व प्रमुख पाहुणे आयु.ललित बाबर सर उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना समाजसेवक आयु.बापूसाहेब ठोकळे सर यांनी केली. लोककल्याणकारी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
लोककल्याणकारी शाहू महाराज यांच्या जीवन कार्याविषयी खूपच छान मार्गदर्शन डॉ. प्रकाश बनसोडे सर यांनी केले .तसेच ललित बाबर सर यांनीही मुलांना खूप छान माहिती दिली.
समाजसेवक बापूसाहेब ठोकळे सर यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दोन-दोन वही, पेन तसेच चिवडा व लाडू खाऊ वाटप करण्यात आला.आयु.बापूसाहेब ठोकळे सर यांनीही मुलांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या वेळी डॉ. प्रकाश बनसोडे साहेब ,दलित चळवळीचे नेते ललित बाबर सर ,नंदू मोरे, गौतम शिंदे , म्युच्युअल डिस्ट्रीब्यूटर दीपक ऐवळे ,
मुरलीधर तोरणे, अंगणवाडी सेविका जयंतीताई बनसोडे, लक्ष्मीताई बनसोडे, शाळेच्या सहशिक्षिका मैनाताई गायकवाड, शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली शेळके मॅडम या सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
0 Comments