Breaking News

खळबळजनक..सांगोला शहरातील एखतपुर रोड शिक्षक कॉलनी समोरील नवीन मोबाईल टॉवरचे काम महिलांनी रोखले

खळबळजनक..सांगोला शहरातील एखतपुर रोड शिक्षक कॉलनी समोरील


नवीन मोबाईल टॉवरचे काम महिलांनी रोखले 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला /प्रतिनिधी: सांगोला शहरातील एखतपूर रोड शिक्षक कॉलनी समोरील नव्याने उभारण्यात येणार असलेल्या मोबाईल टॉवरमुळे मानवी आरोग्यावरील घातक परिणाम लक्षात घेऊन 

या परिसरातील महिलांनी हे काम रोखले आहे. जेसीबीच्या साह्याने पाया खोदण्याचे सुरू केलेले काम या भागातील महिलांनी बंद पाडले. 

मोबाईल टॉवरमुळे मानवी आरोग्यावर खूप मोठे विपरीत परिणाम होतात . यापूर्वी अनेक ठिकाणी लोक वस्तीमध्ये मोबाईल टॉवर उभे

 केल्याने अनेकांना या टॉवरच्या किरणोत्सर्गामुळे वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागले आहे. 

शास्त्रीयदृष्ट्या मोबाईल टॉवरमुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन या परिसरातील महिलांनी एखतपुर रोडच्या बाजूस उभारण्यात येत असलेल्या टॉवरचे काम रोखले आहे. 

यापूर्वीही या  परिसरात दोन ठिकाणी टॉवरचे काम होणार होते ते कामही या परिसरातील महिलांनी रोखल्याने लोक वस्तीत टॉवर उभे झाले नाहीत.

 मोबाईल टॉवरचे काम रोखण्यासाठी शुभांगी पवार, जयश्री पवार, सुमित्रा बिराजदार, श्रीदेवी बिराजदार, आशा बनकर, शांता तनंगे, मनीषा बोराटे यांच्यासह आदी महिला सहभागी झाल्या  होत्या. 

चौकट:

" रोड शिक्षक कॉलनी समोरील नव्याने सुरू करण्यात येणार असलेल्या मोबाईल टॉवरचे काम भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन

 आम्ही महिलांनी बंद पडले आहे. या भागात शाळा, शासकीय कार्यालये तसेच मोठी लोकवस्ती आहे.

 त्यामुळे या भागात मोबाईल टॉवर उभारणे मानवी आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे.  या परिसरातील‌‌ आम्ही महिला हे काम होऊ देणार नाही. 

आज हे काम अडवले आहे व भविष्यातही हे काम करू देणार नाही": सौ .शुभांगी पवार 

Post a Comment

0 Comments