श्री शनिशिंगणापूर मंदिराच्या पवित्र चौथऱ्यावर अन्य पंथियांना प्रवेश दिल्याबद्दल तात्काळ कार्यवाही करावी
सांगोला येथे महाराष्ट्र मंदिर महासंघची तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
सांगोला/ श्री शनिशिंगणापूर मंदिराच्या पवित्र चौथर्यावर मुसलमान कर्मचाऱ्यांना प्रवेश दिल्याबद्दल तसेच आता सध्याही देवस्थान मध्ये स्थानिक ग्रामस्थांच्या माहितीनुसार अनुमान 118 मुसलमान कामगार कार्यरत आहेत.
हिंदू मंदिरांमध्ये इतर धर्मिय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे विशेषतः ज्यांच्या आचरणात मांसाहार, गोमांससेवन व धर्म परंपरेप्रती अनास्था आहे अशा व्यक्तींना मंदिरांच्या अंतर्गत पवित्र स्थळांमध्ये प्रवेश देणे
हे मंदिराच्या सात्विकतेला आणि धार्मिक परंपरांना बाधा पोहोचवणारे आहे तसेच हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे आहे. पावित्र्य भंग करणारे आहे तरी ज्यांनी कोणी या कामाचे कंत्राट दिले
आणि मुसलमान कामगार या ठिकाणी नियुक्त केले त्यांचे निलंबन करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे या मागणीचे निवेदन मा. श्री. देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य), मा. पालकमंत्री, अहिल्यानगर जिल्हा, जिल्हाधिकारी यांच्या नावाने
सांगोला येथे तहसीलदार यांना महाराष्ट्र मंदिर महासंघच्या वतीने, बुधवार ११ जून या दिवशी देण्यात आले. यावेळी निवासी नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे यांनी हे निवेदन स्वीकारले. निवेदन देतेवेळी डॉ मानस कमलापुरकर,
श्रेयश तोडकरी, अजय तेली, गणपत पटेल, नवनाथ कावळे, विकास गावडे, भीमाराम चौधरी, बिरुदेव आगलावे, बाळासाहेब सावंत, विकास सावंत, अक्षय गायकवाड, किशोर शास्त्रे, मच्छिंद्र माने, गोपाळ देशपांडे, विक्रम चव्हाण उपस्थित होते.
0 Comments