google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज.. सोनंद ता. सांगोला येथील कोरडा नदी पात्रात 'दिवसाचं' वाळू उपसा सांगोला पोलिसांचा कारवाई दणका ; एक जेसीबी जप्त तर तिघांविरोधात गुन्हा दाखल

Breaking News

ब्रेकिंग न्यूज.. सोनंद ता. सांगोला येथील कोरडा नदी पात्रात 'दिवसाचं' वाळू उपसा सांगोला पोलिसांचा कारवाई दणका ; एक जेसीबी जप्त तर तिघांविरोधात गुन्हा दाखल

ब्रेकिंग न्यूज.. सोनंद ता. सांगोला येथील कोरडा नदी पात्रात

'दिवसाचं' वाळू उपसा सांगोला पोलिसांचा कारवाई दणका ; एक जेसीबी जप्त तर तिघांविरोधात गुन्हा दाखल

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी);-  मौजे सोनंद ता. सांगोला येथील कोरडा नदीचे पात्रातुन बेकायदेशीर वाळू उपसा चालू असणाऱ्या ठिकाणी सांगोला पोलिसांनी कारवाई जेसीबी वाहन जप्त करत तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

 सदरची कारवाई मंगळवार दिनांक १० जून रोजी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली असून पो. कॉ. लक्ष्मण वाघमोडे यांनी हेमंत भाऊसो सावंत रा . कडलास ता. सांगोला , 

जितेंद्र काकासो चव्हाण रा. चव्हाण मळा , सोनंद ता. सांगोला , अतुल रामराव पाटिल रा. सोनंद ता. सांगोला याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक १० जून रोजी पोलीस निरीक्षक विनोद घुगे  यांनी फिर्यादीस मुख्य कक्षात बोलावूनन सांगितले

 की, मौजे सोनंद गावचे हद्दीत कोरडा नदीचे पात्रात, यल्लमा मंदीराच्या मराठी शाळे लगत  काही जण जेसीबीच्या साहयाने चारचाकी वाहनामध्ये, अवैध्यरीत्या वाळू उपसा करत आहेत. 

 तात्काळ पोलीस हवालदार अस्लम  काझी, दत्तात्रय वजाळे, पो.कॉ. मारुती पांढरे , लक्ष्मण वाघमोडे असे पोलीस पथक सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास 

सोनंद गावात जावून नदीपात्रात वाहने नेहता येत नसल्याने गावाच्या  बाजुला वाहने लावुन नदीपात्रात पोलीस पथक चालत गेलो. 

 सदर ठिकाणी एक जेसीबी मशीनवरील चालक मशिनच्या सहायाने ४०७ टेम्पोमध्ये वाळू भरत असल्याचे दिसला. 

 पोलीस आल्याची चाहूल लागताच टेम्पोवरील चालक ,  टेम्पो घेऊन पळून गेला तर पोलिसांनी वाळू भरत असणारा जेसीबी जागीच पकडला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments