गुटखा विक्रीतील आरोपींना अटक करण्यासाठी सांगोल्यात धरणे आंदोलन
सांगोला (विशेष प्रतिनिधी) सांगोला येथील अवैध विक्री करणारे गुटखा किंग अनिल मस्के, अभी मस्के, अक्षय मस्के, व त्यांना पुरवठा करणारे बिपीन तेजवानी
या प्रमुख आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक करावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते सूरज केराप्पा पडवळकर यांनी सांगोला तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहेत.
यावेळी सुरज पडवलकर यांनी बोलताना सांगितले की सामाजिक स्वास्थ्य ठेवण्यासाठी पोलिसांनी फरार असणाऱ्या वरील आरोपींना तात्काळ शोधून अटक करावी. काही दिवसापूर्वी
सांगोला पोलिसांनी वज्राबाद पेठेत असणाऱ्या मस्के पान शॉप या दुकानावर धडक कारवाई करून दुकान सील केले आहे. परंतु वरील आरोपी फरार झाले आहेत. तरी तात्काळ पोलिसांनी वरील आरोपीना अटक करावी, यासाठी प्रयत्न करावा,
सांगोला व अथणी येथील सराईत गुन्हेगार व गुटखा माफिया यांना त्वरित अटक करावी या भागातील प्रतिबंध गुटखा विक्री कायमस्वरूपी बंद करावी, सदर आरोपीवर सोलापूर सांगली, पुणे जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल
असलेने त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी ,अशी मागणी पडवळकर यांनी केली आहे. अन्यथा सदरचे धरणे आंदोलन सुरूच राहील. असा इशारा ही यावेळी देण्यात आला आहे.
0 Comments