google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील जवळा येथे जेवणाच्या पंगतीत शिवीगाळ; दोन गटात तुंबळ हाणामारी : तिघे गंभीर जखमी

Breaking News

सांगोला तालुक्यातील जवळा येथे जेवणाच्या पंगतीत शिवीगाळ; दोन गटात तुंबळ हाणामारी : तिघे गंभीर जखमी

सांगोला तालुक्यातील जवळा येथे जेवणाच्या पंगतीत शिवीगाळ; दोन गटात तुंबळ हाणामारी : तिघे गंभीर जखमी


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२ )

सांगोला : लग्नामध्ये जेवणाची पंगत वाढताना शिवीगाळ केल्याप्रकरणी दोन गटात चाकू, काठी, लोखंडी रॉडने केलेल्या तुंबळ हाणामारीत तिघे जण गंभीर जखमी झाले तर भांडण सोडवण्यासाठी आलेल्या तिघांनीही मारहाण केली. 

जखमींवर सांगोला येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. ही घटना शुक्रवार, ६ जून रोजी सकाळी ६:३०च्या सुमारास जवळा (ता. सांगोला) येथील अहिल्या चौकात घडली.

याबाबत सखाराम आप्पा खांडेकर व बबन बिरा गावडे (दोघेही रा. भोपसेवाडी, ता. सांगोला) यांनी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बसवंत गावडे, बबन गावडे, विलास गावडे, रामदास गावडे, मच्छिंद्र गावडे. आबासो गावडे तसेच विजय

गावडे, राजाराम गावडे, बाळासाहेब खांडेकर, तुकाराम खांडेकर, सखाराम खांडेकर, अनिल गावडे, अमोल गावडे, शिवाजी गावडे (रा. भोपसेवाडी, ता. सांगोला) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी सखाराम खांडेकर हे ४ जून रोजी मित्र अनिकेत गावडे यांच्या लग्नाला गेले असताना त्या लग्नामध्ये जेवणाच्या पंगतीमध्ये जेवण वाढण्यासाठी मदत करत होते. त्यावेळी फिर्यादीचा बबन गावडे यांच्याशी वाद झाला होता.

 तो तेथील लोकांनी मिटवलाही होता. दरम्यान, ६ जून रोजी सकाळी १०:३० च्या सुमारास फिर्यादी व फिर्यादीचा चुलत भाऊ तुकाराम खांडेकर असे दोघे मिळून दुचाकीवरून सांगोला येथील लग्नकार्यासाठी येत असताना जवळा येथील 

अहिल्या चौकात आले असता, तुम्ही अनिकेत गावडे यांच्या लग्नात मला शिवीगाळ का केली? असे विचारून फिर्यादी व चुलत भाऊ याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments