google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..सांगोला ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची केली जाते हेळसांड

Breaking News

खळबळजनक..सांगोला ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची केली जाते हेळसांड

खळबळजनक..सांगोला ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची केली जाते हेळसांड


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : राज्य सरकारने ग्रामीण भागातील ग्रामस्थांना आरोग्याच्या सेवा मेळाव्यात या हेतूने तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती केली आहे. 

ग्रामीण भागातील लोकांना कमी दरात या रुग्णालयात आरोग्याच्या सेवा उपलब्ध करून देण्यात येतात. व त्यावर राज्य सरकार दरवर्षी कोट्यावधी खर्च करते मात्र ग्रामीण भागातील रुग्णालयात आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे.

 ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी रुग्णालयात येणाऱ्या ग्रामीण भागातील रुग्णांनाची हेळसांड केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार सांगोला ग्रामीण रुग्णालय येथे समोर आला आहे.

शहरी व ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून रुग्णांना अपमानास्पद

ग्रामीण रुग्णालय

आपला हक्क आपला अधिकार भाग १ -

वागणूक मिळत असून त्यामुळे ग्रामीण भागातुन येणाऱ्या रुग्णांना या रुग्णालयात जावे का नाही? असा प्रश्न रुग्णांच्या मनात निर्माण झाला आहे.

 वयोवृद्ध रुग्णांनाची सेवा व्यवस्थित येथील अधिकारी व कर्मचारी करत नसल्याचा तक्रारी नागरिकांमधून चर्चा केली जात आहे. ग्रामीण भागातून दररोज मोठ्या संख्येने रुग्ण या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येत असतात

 परंतु येथे आल्यानंतर रुग्णांना सन्मानाची वागणूकन मिळत असल्यामुळे रुग्णांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. येथिल येणाऱ्या रुग्णांना उद्धट भाषा वापरून अपमानित करण्याचा प्रयत्न येथील अधिकारी व कर्मचारी करत आहेत.

तरी संबंधित अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यावर व कर्मचाऱ्यावर योग्य तो अंकुश ठेवावा अशी मागणी रुग्णांकडून केली जात आहे.

Post a Comment

0 Comments