google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक घटना ! नवरा मेहुनीला घेऊन बेपत्ता, बायकोची मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार; एक महिना होत आला पत्नी अन् कुटुंब शोध घेऊन हैराण

Breaking News

खळबळजनक घटना ! नवरा मेहुनीला घेऊन बेपत्ता, बायकोची मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार; एक महिना होत आला पत्नी अन् कुटुंब शोध घेऊन हैराण

खळबळजनक घटना ! नवरा मेहुनीला घेऊन बेपत्ता, बायकोची मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार;


एक महिना होत आला पत्नी अन् कुटुंब शोध घेऊन हैराण 

नवरा आपल्या मेहुणीला घेऊन बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना मंगळवेढा तालुक्यात घडली असून याप्रकरणी बायकोने मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

निखिल वासुदेव पाटील व सोनिका चिरंजीलाला राठोड बेपत्ता झालेल्या दोघांची नावे आहेत.

मंगळवेढा तालुक्यातील येड्राव परिसरातून ३२ वर्षीय पुरुष व १९ वर्षीय तरुणी मंगळवेढ्याला पाहुण्याकडे जावून येते असे सांगून घराच्या बाहेर पडले ते परतले नसल्याची लेखी तक्रार सदर पुरुषाच्या पत्नीने पोलीसात दिली असून पोलीस त्या दोघांचा कसून शोध घेत आहेत.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, येड्राव परिसरातून वरील दोघेजण दि.१६ मे रोजी दुपारी ४.३० वाजता आम्ही दोघे मंगळवेढा येथील नातेवाईकाकडे जावून येतो असे सांगून घराच्या बाहेर पडले.

ते रात्री उशीरापर्यंत घरी परतलेच नाहीत. कुटुंबातील सदस्यांनी मंगळवेढ्यातील नातेवाईकाकडे व येड्राव परिसरात सर्वत्र आजूबाजूला, मित्र यांच्याकडे चौकशी केली असता ते मिळून आले नाहीत.

त्यांचे वर्णन पुढील प्रमाणे

३२ वर्षीय पुरुष-उंची ५.१० इंच, रंग सावळा, शिक्षण बारावी, शरीर बांधा मध्यम, अंगात नेसणेस पांढऱ्यां रंगाचा चेक्स शर्ट व काळ्या रंगाची पँट तर मुलीचे वय १९ वर्षे असून उंची ५ फुट, रंग गोरा, शिक्षण बारावी, शरीरबांधा सडपातळ,

अंगात नेसणेस नारंगी रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची नाईट पँट अशा वर्णनाचे दोघे कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी तपासिक अंमलदार पोलीस हवालदार प्रमोद मोरे (९८३४८१७८१०) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments