google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 स्व.आ.आबासाहेबां प्रमाणे‌च आ.बाबासाहेब सुध्दा साधी राहणी व उच्च विचारसरणी जोपासतात

Breaking News

स्व.आ.आबासाहेबां प्रमाणे‌च आ.बाबासाहेब सुध्दा साधी राहणी व उच्च विचारसरणी जोपासतात

स्व.आ.आबासाहेबां प्रमाणे‌च आ.बाबासाहेब  सुध्दा साधी राहणी व उच्च विचारसरणी जोपासतात


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

आमदर म्हणजे दुसरे तिसरे‌ काही नसुन जनतेने निवडुन दिलेले लोक प्रतिनिधी आसतात. 

आमदार म्हणजे कायदेशिर रित्या प्रातीनिधीत्व स्वरुपात निवडलेला व्यक्ती होय.आमदार म्हटल‌ं की..

ईतराहून  काही तरी वेगळे आहोत या भ्रमात न राहता.साधी राहणी व‌ उच्च विचारसरणी बाळगण्याची शेतकरी कामगार पक्षाची परंपरा‌ आहे.  

स्व.आबासाहेबांनी आकरा वेळा जनतेचे प्रतिनिधीत्व केले.एवढा प्रदिर्घ काळ आमदार‌ असुनही कुठलाही ठाम-डौल नाही की थाट-माट नाही. हाच विचार हीच कामाची पध्दती घेऊन 

सांगोला विधानसभा मतदार‌ संघाचे नवनिर्वाचीत लोकप्रिय आमदार डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख सुध्दा आपले वर्तन , आबासाहेबांचा विचार कामाची व वागण्याची पध्दती आमदार बाबासाहेब‌ देशमुख यांनी सुध्दा अवलंबली असल्याची  प्रचिती वारंवार येते आहे .      

 शनिवार दि.३१ मे २०२५ रोजी  आमदार बाबासाहेब देशमुख यांनी सामान्य नागरीकां प्रमाणे   एस.टी.बसने प्रवास केला..त्यांच्या‌ या प्रवासा सोबत शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत जेष्ठ‌ नेते भाई भिवा कांबळे (गुरुजी ) सुध्दा होते.

   आमदार साहेबांच्या  एस.टी. प्रवासाने....प्रवास करणारे प्रवाशी तसेच वाहक व चालक सुध्दा अचंबित‌ झाले.खर तर  आमदार साहेबांच्या‌ या वर्तनाने अचंबित होणे,

 नवल वाटणे  सहाजिक आहे..परंतु ही  शेतकरी कामगार पक्षाची परंपरा आसल्याचे मत भाई चंद्रकांत सरतापे यांनी व्यक्त केले....

Post a Comment

0 Comments