google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला चौकातील आंबेडकरांचा पुतळा मध्यरात्री पोलिस बंदोबस्तात हटवला, चबुतराही केला उद्‌ध्‍वस्त; आटपाडीत तणाव

Breaking News

सांगोला चौकातील आंबेडकरांचा पुतळा मध्यरात्री पोलिस बंदोबस्तात हटवला, चबुतराही केला उद्‌ध्‍वस्त; आटपाडीत तणाव

सांगोला चौकातील आंबेडकरांचा पुतळा मध्यरात्री पोलिस बंदोबस्तात हटवला, चबुतराही केला उद्‌ध्‍वस्त; आटपाडीत तणाव



(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

आटपाडी : येथील सांगोला चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा  प्रशासनाने आज पहाटे बंदोबस्तात हटवला.

 चबुतराही उद्‌ध्‍वस्त केला. संतप्त आंबेडकरप्रेमींनी दिवसभर गर्दी केल्याने तणावाची स्थिती होती.

पोलिस बंदोबस्त तैनात आहे.

सांगोला चौकात काही दिवसांपूर्वी आंबेडकरप्रेमींनी मध्यरात्री डॉ. आंबेडकर यांचा पुतळा उभारला. महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाने बंदोबस्तात मध्यरात्री पुतळा हटवला. त्याच दिवशी संतप्त नागरिकांनी दुसरा पुतळा आणून बसवला. 

प्रांताधिकारी विक्रम बांदल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बचत भवन परिसरात सर्व परवानग्या घेऊन पुतळा उभारण्यावर एकमत झाले.

दरम्यान, काल पहाटे महसूल प्रशासनाने सांगोला चौकातील पुतळा दुसऱ्यांदा हटवला. शहरात त्याचे पडसाद उमटले. समाज माध्यमांवरून नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केल्याने

 तालुक्यातून आलेल्या आंबेडकरप्रेमींनी चौकात दिवसभर तळ ठोकला होता. वातावरण तणावाचे बनल्याने परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात आहे.

दरम्यान, तहसील कार्यालयात प्रांताधिकारी विक्रम बांदल, पोलीस उपाधीक्षक विपुल पाटील व आंदोलक यांची बैठक झाली.

 प्रशासनाने पर्यायी जागा देण्याचा प्रस्ताव दिला आहे. दोन दिवसांत कायदेशीर परवानग्या घेऊन तेथे पुतळा उभारण्यास संमती दिली जाईल,

 असे सांगण्यात आले. मात्र कार्यकर्त्यांचे समाधान झाले नाही. मूळ जागेवरच पुतळा उभारण्याची भूमिका मांडली. प्रशासन व नागरिकांत एकमत झाले नाही. त्यामुळे वातावरण तणावाचे बनले आहे. बंदोबस्त तैनात आहे.

Post a Comment

0 Comments