चालक-वाहक व सामांन्य प्रवाशी यांच्या हस्ते नवीन बसेसची पुजा करुन
आ.डाॅ.भाई बाबासाहेब देशमुखांनी दाखवला मनाचा मोठेपणा
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
लोकप्रिय आमदार बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभेत गोरगरीब नागरीकांच्या प्रवासाची अडचण लक्षात घेऊन...
विधानसभेच्या अधिवेशनात नवीन एस.टी.बसेसची मागणी केलेली होती.तसेच एस.टी महामंडळाचे अध्यक्ष आमदार प्रताप सरनाईक यांच्या कडे सुध्दा पाठपुरावा केला होता.
आमदार साहेबांच्या या मागणीचा विचार करुन राज्य सरकारने सांगोला आगारास नविन पाच बसेस दिल्या त्या बसेसचे पुजन आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते करण्याचे आयोजन आगार प्रमुखा़नी केले होते..
परंतु आमदार बाबासाहेब देशमुख यांनी या मात्र नवीन बसेसची पुजा सांगोला आगाराचे चालक वाहक व कर्मचारी यांच्या व सामान्य प्रवाशांच्या हस्ते करण्याच्या आगर प्रमुखांना सुचना दिल्या..
आमदार साहेबांच्या या सुचनांने चालक,वाहक व कर्मचारी व प्रवाशी वर्ग अचंबित झाले.व या आलेल्या नवीन पाच बसेसचे पुजन आमदार साहेबांच्या सुचनेनुसार सर्वसामान्य चालक- वाहक, कर्माचारी व प्रवाशी वर्ग यांच्या हस्ते झाल्याने सांगोला आगारात आमदार बाबासाहेबांच्या या कृतीने सर्व जण चकीत झाले असुन.
सध्या अनेक जण श्रेयासठी पुढे-पुढे करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत असताना आमदार साहेबांनी या सामान्य कर्माचाऱ्यांना व प्रवाशांना दिलेल्या संन्मानाची चर्चा वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली..
व नागरीकांमध्ये आमदार बाबासाहेब देशमुख हे एक सर्वसामांन्यातील आमदार आहेत ही भावना पुन्हा दृढ झाली आसल्याची माहीती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली..
0 Comments