ब्रेकिंग न्यूज! दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
काही दिवसांपूर्वी बारावीच्या परिक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर अनेकांचे डोळे हे दहावीचा निकाल कधी लागणार,
याकडे लागून राहिले होते. मात्र, आता लाखो विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची प्रतिक्षा संपली असून उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्य़ांना दहावीचा निकाल पाहता येणार आहे.
कुठे पाहाल निकाल?
https://results.digilocker.gov.in
https://sscresult.mahahsscboard.in
http://sscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org
उद्या दुपारी एक वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल.
महाराष्ट्र बोर्डाने यंदा अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबची माहिती बोर्डाने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून यापूर्वीच दिली आहे.
0 Comments