शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष खा. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने
डॉ.परेश खंडागळे व डॉ.स्वाती खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सर्व रोग आरोग्य तपासणी शिबीर व सर्व प्रकारच्या मोफत शस्त्रक्रिया
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला/प्रतिनिधीः महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या एकनाथ हिरक आरोग्य वर्षानिमित्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना मदत कक्ष, खासदार श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व आरोग्यदुत फाऊंडेशन
व खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सांगोला तालुक्यातील नामांकित डॉ.परेश खंडागळे व डॉ. स्वाती खंडागळे यांच्या वाढदिवासानिमित्त व लग्नाच्या वाढदिवसानिमित्त
कडलास रोडवरील खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बुधवार दि. 28 मे, शनिवार 7 जून वबुधवार 9जुलै 2025 रोजी मोफत सर्व रोग निदान शिबीर व सर्व प्रकारच्या मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.
त्याबरोबर तीन दिवस हॉस्पिटलचे रूग्णाचे एक रूपयाही बिल घेतले जाणार नाही. मोफत हॉस्पिटलमध्ये सुविधा दिल्या जातील. अशी माहिती खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संस्थापक संचालक डॉ.परेश खंडागळे व डॉ.स्वाती खंडागळे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख व वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष आरोग्यदुत मंगेशदादा चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर गोरगरीब रूग्णांना अहोरात्र मदत केली जात आहे.
महाराष्ट्रातील हजारो रुग्णांचे प्राण मंगेश दादा चिवटे यांनी वैद्यकीय मदत केल्यामुळे वाचलेले आहे राज्याच्या कानाकोपर्यामध्ये दररोज मोफत आरोग्य तपासणी शिबीरे व मोफत औषध वाटप केली जात आहेत
त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या एकनाथ हिरक आरोग्य वर्षानिमित्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना मदत कक्ष, खासदार श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व
आरोग्यदुत फाऊंडेशन व खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सांगोला तालुक्यातील नामांकित डॉ.परेश खंडागळे व डॉ. स्वाती खंडागळे यांच्या वाढदिवासानिमित्त व लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कडलास रोडवरील
खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बुधवार दि. 28 मे, 7 जून व बुधवार 9 जुलै 2025 रोजी मोफत सर्व रोग निदान शिबीर व सर्व प्रकारच्या मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. त्याबरोबर तीन दिवस हॉस्पिटलचे रूग्णाचे एक रूपयाही बिल घेतले जाणार नाही.
या शिबीरामध्ये रूग्णांच्या तपासणी व शस्त्रक्रिया करण्यासाठी महाराष्ट्रातील नामांकित डॉक्टर्स उपस्थित राहणार आहेत. या शिबीरामध्ये हॉस्पिटलचा एक रूपयाही रूग्णांना खर्च करावा लागणार नाही. सर्व तपासण्या व शस्त्रक्रिया मोफत होणार आहे.
यामध्ये सिजिरियन, प्रसुती त्याचबरोबर सर्व फ्रॅक्चरच्या शस्त्रक्रिया पुर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत. अॅपेंडिक्स, हरनिया, फिशर, गर्भाशय पिशवी काढणे, मुतखडा,
प्रोस्टेट, दुर्बिणीद्वारे काही शस्त्रक्रिया पुर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत. हॉस्पिटलमध्ये मेडिसीन, भुल व रक्ताच्या चाचण्याचा खर्च रूग्णांना करावा लागणार आहे. कान- नाक- घसा या संदर्भातील शस्त्रक्रियामध्येही सवलत दिली जाणार आहे.
तसेच खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बांधकाम कामगार योजना, महात्मा फुले जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना या योजनेतंर्गत सांगोला शहर व तालुक्यासह आजुबाजुच्या
तालुक्यातील गोरगरीब रूग्णांना मोफत उपचार व शस्त्रक्रिया कायमस्वरूपी केल्या जात आहेत.आत्ता पर्यंत गेल्या 12 वर्षांमध्ये अनेक मोफत शस्त्रक्रिया व उपचार केले आहेत.त्याच प्रमाणे अल्प दरामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
आत्ता पर्यंत खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉ.परेश खंडागळे व डॉ.स्वाती खंडागळे यांनी जवळपास 800 नॉर्मल प्रसुती मोफत केल्या आहेत. व गोरगरीब रुग्णांना कमीत कमी दरात उपचारही केलेले आहेत
बुधवार दि. 28 मे, शनिवार 7 जून व बुधवार 9 जुलै 2025 या तिन्ही दिवशी खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये मोफत आरोग्य तपासणी, सर्वरोग निदान तपासणी तसेच सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया पुर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत.
त्यामुळे सांगोला शहर व तालुक्यासह आजुबाजुच्या तालुक्यातील गोरगरीब रूग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.परेश खंडागळे व डॉ. स्वाती खंडागळे यांनी केले आहे.
चौकटीमध्ये
महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री ना, एकनाथ शिंदे साहेब यांच्या एकनाथ हिरक आरोग्य वर्षानिमित्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ,खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशन व आरोग्य दूत फाउंडेशन यांच्या वतीने
सांगोला शहरांमध्ये भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर औषध वाटपही व चष्मे वाटप महा आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा, एकनाथ शिंदे साहेब यांनी करून
सांगोल्या मध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची व खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशन ची स्थापना करण्याचे घोषित केले होते पंढरपूर विभागाच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या प्रमुख पदी सतीश सावंत यांची निवड
मा,एकनाथ शिंदे साहेब खासदार श्रीकांत शिंदे व उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक व शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आरोग्य दूत मंगेश दादा चिवटे साहेब यांनी केली आहे
सतीश सावंत यांचे काम युद्ध आरोग्याच्या संदर्भात युद्ध पातळीवर सुरू आहे लवकरच सांगोला शहरांमध्ये वैद्यकीय मदत कक्षा चे कार्यालय सुरू करण्यात येणार
असून 24 तास रुग्णांच्या सेवेसाठी हा मदत कक्ष उपलब्ध असल्याची व रुग्णांना वैद्यकीय मदत 24 तास करणार असल्याची शिवसेने वैद्यकीय मदत कक्षाचे पंढरपूर विभागाचे प्रमुख सतीश सावंत यांनी सांगितले
0 Comments