Breaking News

धक्कादायक..सोलापुरातून हळहळ..आईच्या कुशीतच एक वर्षाच्या बाळाने जीव सोडला सोलापूर आग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला

धक्कादायक..सोलापुरातून हळहळ..आईच्या कुशीतच एक वर्षाच्या बाळाने जीव सोडला सोलापूर आग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला


सोलापूर शहरातील अक्कलकोट महामार्गावरील एमआयडीसीत एका टॉवेल कारखान्यात लागलेल्या भीषण आगीत श्वास गुदमरून आणि होरपळून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. 

या आगीत सेंट्रल हँडलूम इंडस्ट्रीजचे मालक 78 वर्षीय उस्मान मन्सूरी, त्यांचा मुलगा 25 वर्षीय अनस मन्सूरी, त्यांची 24 वर्षीय पत्नी शिफा आणि त्यांचा एका वर्षाचा मुलगा युसूफ असे संपूर्ण कुटुंबाचा यामध्ये मृत्यू झाला.

याशिवाय कारखान्यातच राहणारे कामगार 51 वर्षीय मेहताब बागवान, 45 वर्षीय आयेशा बागवान, 35 वर्षीय हिना बागवान आणि 18 वर्षीय सलमान बागवान यांचाही आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. 

मृतांमध्ये एकूण ५ पुरुष, २ महिला आणि एका बालकाचा दुर्दैवी अंत झाला आहे. अग्निशमन दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल आणि एनटीपीसीच्या जवानांनी आगीवर तब्बल 12 तासानंतर नियंत्रण मिळवले. या घटनेने सोलापुरातून हळहळ व्यक्त होत आहे. 

आगीच्या वर्दीनंतर महापालिकेची यंत्रणा आग विझवण्यात तोकडी पडल्याचा आरोप होत आहे. आग विझवण्यासाठी पाणीही कमी पडले. या प्रकरणाची सविस्तर चौकशी व्हावी अशी विनंती राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments