google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..सोलापूर जिल्ह्यात साठ हजार नागरिकांना टँकरने पाणी

Breaking News

मोठी बातमी..सोलापूर जिल्ह्यात साठ हजार नागरिकांना टँकरने पाणी

मोठी बातमी..सोलापूर जिल्ह्यात साठ हजार नागरिकांना टँकरने पाणी


सोलापूर जिल्ह्यातील पाणी पातळी घटल्याने 30 गावे, 212 वाड्या-वस्त्यांमधील 63 हजार 427 लोकांना 36 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

मागील आठवड्यात जिल्ह्यात 21 टँकर सुरू होते. मात्र, पाण्याची टंचाई जाणवत असल्याने विविध तालुक्यांतून टँकरची मागणी आल्याने 15 टँकर वाढले आहेत.

सध्या जिल्ह्यातील विविध तालुक्यांत 36 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

सध्या सांगोला तालुक्यातील दोन गावे, 16 वाड्या, मंगळवेढा तालुक्यातील तीने गावे, 21 वाड्या, करमाळा येथे तीन गावे, 23 वाड्या, माळशिरस येथे 14 गावे 152 वाड्या, दक्षिण सोलापूर तालुक्यात चार गावे, उत्तर सोलापूर तालुक्यात दोन गावे,

 अक्कलकोट तालुक्यात दोन गावे असे एकूण 30 गावे आणि 212 वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

 मागील तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील पाण्याचे टँकर कमी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील माढा, मोहोळ, बार्शी आणि पंढरपूर तालुका वगळता इतर सात तालुक्यातील 60 हजारांपेक्षा जास्त नागरिकांना 

आणि 53 हजार जनावरांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पुढील काळात जिल्ह्यात पाऊस न पडल्यास टँकरच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

तालुकानिहाय टँकर संख्या

सांगोला - 2, मंगळवेढा - 5, करमाळा - 3, दक्षिण सोलापूर -5, उत्तर सोलापूर -4, अक्कलकोट -3, माळशिरस 14, एकूण 36

48 तासांच्या आत टँकर द्या

जिल्ह्याच्या कोणत्याही भागातून नागरिकांनी पाण्याच्या टँकरची मागणी केल्यानंतर प्रशासनाने 48 तासाच्या आत टँकर सुरू करावा, 

असे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. शुक्रवारी झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments