google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक...तुझा संतोष देशमुख पार्ट 2 करू, बीडमध्ये टोळक्यांकडून तरुणाला काठी, बेल्टने बेदम मारहाण

Breaking News

धक्कादायक...तुझा संतोष देशमुख पार्ट 2 करू, बीडमध्ये टोळक्यांकडून तरुणाला काठी, बेल्टने बेदम मारहाण

धक्कादायक...तुझा संतोष देशमुख पार्ट 2 करू, बीडमध्ये टोळक्यांकडून तरुणाला काठी, बेल्टने बेदम मारहाण


बिड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील जलालपूर भागात तरुणांच्या टोळक्यांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

 यामध्ये टोळक्यातील एक-एक करून प्रत्येक जण काठी, बेल्टने तरुणाला बेदम मारहाण करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

बीड जिल्हा मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे चर्चेत आला होता. त्यानंतर या जिल्ह्यातील गुंडगिरीची अनेक प्रकरणं समोर आली होती. 

आता या सर्व घटना मागे पडत असतानाच परळी तालुक्यातील बेदम मारहाणीची ही नवी घटना समोर आली आहे.

 या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार परळीतील जलालपूर भागात टोळक्यांनी तरुणाला बेदम मारहाण केली आहे. परळी शहरातील जलालपूर येथे एक कार्यक्रम होता. 

या कार्यक्रमात झालेल्या वादाचा राग मनात धरून 10 ते 12 जणांच्या टोळक्याने पीडित तरूणाचे अगोदर अपहरण केले. यानंतर टोळक्याने तरूणाला अमानुषपणे मारहाण केली आहे. अजूनही या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. मारहाण झालेल्या तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाण करणार्‍या माथेफिरूंना लवकरात लवकर अटक करावी तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणात आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी पथके रवाना केली आहेत. आरोपींची ओळख उघड करण्यात आली आहे. एफआयआर नोंदणीची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक नवनित काँवत यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments