google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कमलापूर गावचे शेकापचे नारायण बंडगर यांचे निधन

Breaking News

कमलापूर गावचे शेकापचे नारायण बंडगर यांचे निधन

कमलापूर गावचे शेकापचे नारायण बंडगर यांचे निधन


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

कमलापूर (प्रतिनिधी ) कमलापूर गावचे, हर हुन्नरी व्यक्तिमत्व, साधा,सरळ,मितभाषी सर्वांना आपलेसे वाटणारे व्यक्तिमत्व,शेतकरी कामगार पक्षाचे माजी ग्रामपंचायत सदस्य,नारायण गणू बंडगर  यांचे कमलापूर अजनाळे रोडवर  अपघाती दुःखद निधन झाले.

 निधन समयी ते 67 वर्षे होते.स्वर्गीय आ.गणपतराव देशमुख व आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्यावर प्रचंड प्रेम असणारे नारायण बंडगर होते. 

समाजकारण व अर्थकारणामध्ये हिरवेने सहभागी होत असत.प्रसिद्ध असा जर्सी गाईचा गोठा आदर्श गोटा म्हणून सांगोला व आसपासच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. 

मानसिद्ध दूध डेअरीचे चेअरमन, कमलापूर विकास सेवा सोसायटीचे संचालक  दिलीप बंडगर  व चंद्रकांत बंडगर  यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात  पत्नी, दोन मुले, मुलगी, पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

 त्यांच्या अचानक जाण्याने   कमलापूर पंचक्रोशीत  हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचा तिसरा दिवस  माती सावडण्याचा कार्यक्रम  वार सोमवार दिनांक 19 मे 2025 रोजी  सकाळी सात वाजता कमलापूर स्मशानभूमी मध्ये आयोजित केला आहे.

Post a Comment

0 Comments