google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयाचा सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात जल्लोष साजरा

Breaking News

जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयाचा सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात जल्लोष साजरा

जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयाचा सोलापूर ग्रामीण  जिल्ह्यात जल्लोष साजरा



(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (तालुका प्रतिनिधी): देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेची घोषणा करून सर्व समावेशक धोरणाचा नवा अध्याय सुरू केला आहे. 

या निर्णयाचा सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील १४ मंडलात पेढे वाटून जल्लोष साजरा केला असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली. 

       पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेची घोषणा केली आहे. ही जनगणना शैक्षणिक व सामाजिक आरक्षण धोरणांना अधिक न्याय बनवेल हा विश्वास आहे. हा निर्णय सामाजिक न्यायाच्या दिशेने भारताने सकारात्मकतेने टाकलेले पाऊल आहे. 

या निर्णयाचा भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण  जिल्ह्याच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

      येत्या काळात केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे येत्या काळात विविध जातसमुहाच्या आधारावर आरक्षणाचा निर्णय घेणे केंद्र सरकारला सोपे होणार आहे. 

केंद्र सरकारने घेतलेल्या या धाडसी निर्णयामुळे येत्या काळात देशातील विविध जातीची नेमकी संख्या व त्यांची स्थिती समजण्यास मदत होणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments