google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात आपापल्या गावी चोरी होवू नये यासाठी पोलीस मित्र करून रात्री पोलिसांसह प्रभावीपणे गस्त करावी नूतन पोलीस निरीक्षक विनोद घुगे. यांनी तालुक्यातील पोलीस पाटील यांना केले मार्गदर्शन.

Breaking News

सांगोला तालुक्यात आपापल्या गावी चोरी होवू नये यासाठी पोलीस मित्र करून रात्री पोलिसांसह प्रभावीपणे गस्त करावी नूतन पोलीस निरीक्षक विनोद घुगे. यांनी तालुक्यातील पोलीस पाटील यांना केले मार्गदर्शन.

सांगोला तालुक्यात आपापल्या गावी चोरी होवू नये यासाठी पोलीस मित्र करून रात्री पोलिसांसह प्रभावीपणे


गस्त करावी नूतन पोलीस निरीक्षक विनोद घुगे. यांनी तालुक्यातील पोलीस पाटील यांना केले मार्गदर्शन.

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

पोलीस प्रशासनामध्ये काम करत असताना जनहिताचे पोलीसिंग राबविण्यामध्ये पोलीस पाटील यांची भूमिका महत्वाची असते जनता आणि पोलीस यांच्यामधील दुवा म्हणजे पोलीस पाटील असे

 प्रतिपादन नूतन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी केले शुक्रवार दि. २ मे रोजी पंचायत समिती बचत भवन येथे पोलीस पाटील यांच्या बैठकीमध्ये ते बोलत होते.

यावेळी पोलीस पाटील संघटनेचे राज्य अध्यक्ष दिलीप पाटील, कार्यकारणी सदस्य हलीमसो पाटील, सौ रेखा आवताडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रभाकर कांबळे, 

तालुका अध्यक्ष गणेश खटकाळे महिला अध्यक्ष सुरेखा खांडेकर आदी पदाधिकारी व पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नूतन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी तालुक्यातील पोलीस पाटील यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की तालुक्यातील पोलीस पाटील यांनी काम पाहत असताना गावामध्ये निःपक्षपाती काम करावे,

 गावागावांमध्ये ग्रामसुरक्षा दल कार्यान्वित करावे तालुक्यातील कोणत्याही गावामध्ये काही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे

 तसेच आपापल्या गावी चोरी होवू नये यासाठी पोलीस मित्र करून रात्री पोलिसांसह प्रभावीपणे गस्त करावी पोलीस पाटील यांना अशा सूचना 

यावेळी घुगे यांनी दिल्या यावेळी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेतर्फे नूतन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचा यथोचित सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Post a Comment

0 Comments