google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक.. बंधुप्रेम निशब्द! लहान भावाच्या मृत्यूचं दु:ख, मोठ्या भावानेही सोडले प्राण; मंगळवेढ्यात अख्खं कुटुंब झालं उद्धवस्त; घडलेल्या घटनेने समाजमन हळहळ

Breaking News

खळबळजनक.. बंधुप्रेम निशब्द! लहान भावाच्या मृत्यूचं दु:ख, मोठ्या भावानेही सोडले प्राण; मंगळवेढ्यात अख्खं कुटुंब झालं उद्धवस्त; घडलेल्या घटनेने समाजमन हळहळ

खळबळजनक.. बंधुप्रेम निशब्द! लहान भावाच्या मृत्यूचं दु:ख, मोठ्या भावानेही सोडले प्राण;


मंगळवेढ्यात अख्खं कुटुंब झालं उद्धवस्त; घडलेल्या घटनेने समाजमन हळहळ 

सख्खे भाऊ पक्के वैरी असे म्हणतात. तशा प्रकारच्या गुन्हेगारीच्या घटना घडल्याने ही म्हण प्रचलित झाली असावी…पण कुटूुंबातील आपलेपणा कधीकधी मनाला चटका लावून जातो. त्यातून मन हेलावणाऱ्या घटना घडतात.

आजारी असलेल्या आपल्या लहान भावाचा मृत्यू झाल्याचे समजताच मोठ्या भावाला ही हृदयविकाराचा धक्का बसला आणि त्यांचेही निधन झाल्याची घटना मंगळवेढा परिसरात घडली आहे. या घटनेने भावाबद्दल असणारे प्रेम निशब्द करून टाकते. या घटनेने परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

लहान भावाचे अल्पशा आजाराने निधन झाल्याचे दुःख सहन न झाल्याने त्याच्या थोरल्या भावाचा अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यातच निधन झाल्याने एकाच घरातील दोन विवाहित तरूण मृत पावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवेढा शहरातील किल्ला भागातील सेवानिवृत्त मैलमजूर अंबादास मेटकरी यांच्या ३० वर्षीय योगेश मेटकरी याचे कावीळीच्या आजाराने निधन झाले.

या निधनाचे दुःख सहन न झाल्याने याचा थोरला भाऊ सचिन मेटकरी (वय ३२) यालाही अस्वस्थ वाटू लागले. त्यातच त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्यातच त्याचे निधन झाले.

योगेश मेटकरी यांचे पश्चात आई वडील, पत्नी, मुलगी तर सचिन याचे पश्चात आई वडील व मुलगा असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments