google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..लाडक्या बहिणींना आता 'एवढ्या' हजारांचे कर्ज; हप्ता योजनेतून कापणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

Breaking News

मोठी बातमी..लाडक्या बहिणींना आता 'एवढ्या' हजारांचे कर्ज; हप्ता योजनेतून कापणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

मोठी बातमी..लाडक्या बहिणींना आता 'एवढ्या' हजारांचे कर्ज;


हप्ता योजनेतून कापणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा 

लाडकी बहीण योजनेतून दरमहा १५०० रुपये दिले जातात. या योजनेत सरकारने नवीन प्रस्ताव आणला आहे. बहिणींना व्यवसाय उभारणीसाठी ४० हजारांपर्यंत कर्ज देऊन त्याचे हप्ते लाडकी बहीण योजनेच्या रकमेतून कापले जातील, 

अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिली. चव्हाणवाडी (ता. मुखेड) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची उपस्थिती होती.

शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी जे वीज बिल येते त्यापोटी महिन्याला २० हजार कोटी रुपयांचा खर्च येत आहे. तो आटोक्यात आणण्यासाठी २४ तास वीजेसाठी सोलार पॅनल बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, असे पवार म्हणाले.

एआयमुळे पाणी बचत

यंदा कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा कृषी क्षेत्रात वापर केला जाणार आहे. यासाठी बजेटमध्ये ५०० कोटींची तरतूद केली आहे. हे तंत्रज्ञान कमालीचे फायदेशीर ठरले आहे.

सोयाबीन, कापूस, ऊस, मका, धान, कांदा ही पिके घेणाऱ्या राज्यातील असंख्य शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर केला आहे. यामुळे पाणी व खतांमध्ये ५० टक्के बचत होते व उत्पादन दीड पटीने वाढते, हे सिद्ध झाले आहे, असे पवार म्हणाले.

Post a Comment

0 Comments