आपुलकी प्रतिष्ठानच्या कार्यालयाचा रविवारी उद्घाटन समारंभ भेटवस्तू /
पुष्पहार न देता शैक्षणिक साहित्य भेट देण्याची विनंती!
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला ( प्रतिनिधी )- सामाजिक कार्यात सांगोला तालुक्यात अग्रेसर असलेल्या आपुलकी प्रतिष्ठान, सांगोला या (रजि.) संस्थेच्या कार्यालयाचा उद्घाटन समारंभ श्री. राजू बंडगर व
सौ.सुरेखा बंडगर या दिव्यांग दाम्पत्याच्या हस्ते रविवार दि. १८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित केला असल्याची माहिती अध्यक्ष राजेंद्र यादव व सचिव संतोष महिमकर यांनी दिली.
गेल्या सहा वर्षापासून सामाजिक कार्यात नावलौकिक कमावलेल्या आपुलकी प्रतिष्ठान सांगोला या संस्थेच्या कार्यालयाचा शुभारंभ नगरपालिकेशेजारी माळवाडी रस्त्यावर असलेल्या नगरपालिकेच्या गाळा क्र. ३ मध्ये होत असून आपुलकीच्या देणगीदारांनी,
आपुलकीवर प्रेम करणाऱ्या सर्व हितचिंतकानी रविवार १८ मे रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत आपल्या कुटुंबियांसह उपस्थित राहून आपुलकी दाखवावी, अशी विनंती आपुलकी सदस्यांकडून करण्यात आली आहे.
या कार्यक्रमास भेटवस्तू / पुष्पहार वगैरे न आणता वह्या / पेन व इतर शैक्षणिक साहित्य आणले तर ते आनंदाने स्वीकारले जाईल असेही संयोजकांनी कळवले आहे.
0 Comments