google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..अडी अडचणी जाणून घेण्यासाठी सकाळी 8 वाजता मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य हमीभाव आणि स्वतंत्र व्यापार पेठ मिळावी म्हणून कृषिमंत्री व फलोत्पादन मंत्री यांच्यासमवेत चर्चा करणार : मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील

Breaking News

मोठी बातमी..अडी अडचणी जाणून घेण्यासाठी सकाळी 8 वाजता मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य हमीभाव आणि स्वतंत्र व्यापार पेठ मिळावी म्हणून कृषिमंत्री व फलोत्पादन मंत्री यांच्यासमवेत चर्चा करणार : मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील

मोठी बातमी..अडी अडचणी जाणून घेण्यासाठी सकाळी 8 वाजता


मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य हमीभाव आणि स्वतंत्र व्यापार पेठ मिळावी म्हणून

कृषिमंत्री व फलोत्पादन मंत्री यांच्यासमवेत चर्चा करणार : मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला ; तालुका प्रतिनिधी शेतकऱ्यांनी पिकवलं तरच आपण नीटपणे आगदी वेळेवर जेवण जेवतो त्यामुळे बळीराजा वाचला तर देश वाचेल.

 म्हणून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी सकाळी 8 वाजता मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील हे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. 

दरम्यान शिरभावी येथील प्रगतशील शेतकरी कांतीलाल अरुण फडतरे यांची आंब्याची बाग तर प्रगतशील शेतकरी धनाजी लक्ष्मण साळुंखे यांच्या मिरची प्लॉटला भेट देऊन

 शेतकऱ्यांच्या अडी - अडचणी जाणून घेतल्या. दरम्यान विक्रमी उत्पादन घेतले म्हणून साळुंखे व फडतरे या बहाद्दर शेतकऱ्यांचा शेताच्या बांधावरच फेटा शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. 

      यावेळी पत्रकारांशी बोलताना मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या सुखा दुखात सहभागी होऊन त्यांना नेहमीच आधार देण्याची भूमिका साळुंखे पाटील कुटुंबियांनी घेतली आहे. ज्या - ज्या वेळी संकट आली 

त्या त्यावेळी प्रशासनाला बांधावर घेऊन जाण्याची भूमिका आम्ही एक बजावली आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन येथील बळीराजांनी केलेल्या कष्टाला न्याय देण्याची मागणी नेहमीच केली आहे. 

याचाच एक भाग म्हणून, सांगोला तालुक्यात शिरभावी हे गाव शेती उत्पादनाच्या बाबतीत अग्रेसर गाव आहे. येथील शेतकरी जिद्द चिकाटी आणि कष्टाने प्रत्येक उत्पादनात अग्रेसर आहेत. 

यामध्येच बहाद्दर शेतकरी धनाजी साळुंखे यांनी 25 गुंठ्यामध्ये मिरची पिकाची लागवड केली आहे. आत्ता बहार सुरू झाला असून सध्या नऊ टन मिरची विक्री केली आहे. या पुढील काळात 15 ते 16 टन मिरची उत्पादन होईल. 

असे एकंदरीत 25 टन मिरची विक्री होईल असा अंदाज धनाजी साळुंखे यांनी वर्तवला आहे. यावरून राज्यात सर्वात विक्रमी उत्पादन घेणारा शेतकरी म्हणून या गावची ओळख निर्माण झाली 

असून, याबरोबरच माळावरची दगडाची जमीन फोडून सुपीक करून त्यामध्ये आंब्याची बाग लागवड केली आहे. सदरची बाग ही कोकण प्रमाणे फुलली आहे. 

सर्वसाधारण एकरी पाच लाख रुपये उत्पन्न घेत असल्याची माहिती कांतीलाल फडतरे यांनी दिले असून त्यांची 13 एकर आंब्याची बाग आहे याही शेतकऱ्याने विक्रमी उत्पादन घेतले 

असून, या बहाद्दर शेतकऱ्यांच्या कष्टाला आणि त्यांच्या मेहनतीला निश्चितपणाने शाबासकीची थाप मिळावी म्हणून, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सदर धनाजी साळुंखे व कांतीलाल फडतरे या 

दोन्ही कुटुंबीयांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान शेतीमालाला बाजारपेठ उपलब्ध होत नाही, यामध्ये दलाली करणारे व्यापारी आहेत त्यांच्याकडूनही नुकसान होत असून, 

शेतकऱ्यांच्या चांगल्या क्वालिटीच्या शेतीमालाला व्यापार पेठ मिळावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली. यासह सांगोल्यात पिकणाऱ्या वेगवेगळ्या फळ पिकाला शासनाच्या अनुदान मिळावे अशी ही मागणी शेतकऱ्यांनी केली. 

त्यावर थेट कृषिमंत्री व फलोत्पादन मंत्री यांच्या समवेत चर्चा करून, शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करणार असल्याचे मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सांगितले. 

   यावेळी शिरभावी गावचे ज्येष्ठ नेते शहाजीदाजी नलवडे, महिला आघाडीच्या नेत्या सखुताई वाघमारे, कृषी सहाय्यक नलवडे, श्री चंद्रकांत शिंदे, सत्यवान फडतरे, संभाजी खेंडकर, 

भाऊ पवार, अनिल ढोले, विलास नलवडे, पांडुरंग नलवडे, नवनाथ ताटे - देशमुख, अर्जुन शिंदे, विष्णू घोरपडे, माऊली पालकर, आदिनाथ घोडके, नवनाथ मोरे, राजेंद्र ताटे देशमुख, अरविंद नलवडे, 

आप्पासाहेब नलवडे, घोरपडे सर, बाळासो शिंदे, संदीप चव्हाण, शिवाजी खेंडकर, शशिकांत हिलाळ, भाऊ शिंदे, सूर्यकांत जगदाळे, सुरेश साळुंखे, पोपट रणदिवे यांचेसह शिरभावी व परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट : 

भयान आशा माळरानावर आणि कमी पाण्यावर येथील बळीराजांनी मोठ्या कष्टाने शेती उत्पादनात आघाडी घेतली आहे. परंतु शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजना पासून पात्र असूनही शेतकरी वंचित आहेत. यामधील त्रुटी दूर करण्यासाठी कृषी मंत्री व फलोत्पादन 

मंत्री यांच्यासमवेत तालुक्यातील शेतकऱ्यांची संयुक्त बैठक बोलावून फलोत्पादन विभागातील त्रुटी दूर करून येथील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार. 

      मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील

Post a Comment

0 Comments