google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भयानक! आई, वडील, भाऊ, बहीणसह नातेवाईकांकडून मानसिक त्रास; तरुणाने केली आत्महत्या सोलापूर जिल्ह्यातील घटना..

Breaking News

भयानक! आई, वडील, भाऊ, बहीणसह नातेवाईकांकडून मानसिक त्रास; तरुणाने केली आत्महत्या सोलापूर जिल्ह्यातील घटना..

भयानक! आई, वडील, भाऊ, बहीणसह नातेवाईकांकडून


मानसिक त्रास; तरुणाने केली आत्महत्या सोलापूर जिल्ह्यातील घटना..

शेतीच्या वाटणीवरुन आई, वडील, भाऊ, बहिणींसह अन्य नातेवाइकांकडून सातत्याने होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून

अनगर (ता. मोहोळ) येथील एका ३५ वर्षीय तरुणाने सोशल मिडीयावर मेसेज टाकून स्वतःच्या शेतातील जांभळाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली.

सिध्देश्वर सत्यवान गुंड असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आई, वडील, भाऊ, बहिण यांच्यासह १३ नातेवाइकांविरुध्द मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत मृत सिध्देश्वर गुंड याचे सासरे शिवाजी सूर्यभान सालगुडे (रा. कुरणवाडी, अनगर, ता.म ता. मोहोळ, जि. सोलापूर) 1. सोलापूर) 

यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या मुलीचा विवाह सिध्देश्वर गुंड याच्याशी २०१६ मध्ये झाला.

विवाहाच्या दोन वर्षांनंतर त्यांच्या घरात शेतीच्या वाटणीवरुन तक्रारी होत होत्या. 

त्याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यात जावयाच्या विरोधात त्याचे वडील व भाऊंनी तक्रारी दाखल केल्या होत्या. घरात सतत वाद-विवाद होत असल्याने मुलगी माहेरी निघून आली होती.

बुधवार, १६ एप्रिल २०२५ रोजी जावई सिध्देश्वर गुंड यांच्या मोबाईलवरून मेसेज आला. त्यात जावई सिध्देश्वर यांचे वडील सत्यवान गुंड, 

आई इंदू गुंड, भाऊ बळिराम गुंड, वहिनी वनिता गुंड (चौघेही रा. अनगर), बहीण सुरेखा लटके, नंदवा अंकुश लटके (रा. अंजनगाव),

संतोष शेंबडे (रा. कोन्हेरी), प्रमिला सगरे (रा.अनगर), मामा हनुमंत गायकवाड (रा.बिटले), शेजारी ज्ञानदेव सरक (रा.अनगर), चुलत भाऊ गजानन गुंड व दत्तात्रय गुंड (रा. भोसे), 

चुलत बहीण रेणुका डोके (रा. सोलापूर) यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून हे पाऊल टाकत आहे, असा उल्लेख केला होता, असेही या फिर्यादीत नमूद आहे.

Post a Comment

0 Comments