शेतीसाठी आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब आवश्यक महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्याचा सरकारचा मानस:
जलसंपदामंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील सांगोल्यात एकविसाव्या महाराष्ट्र सिंचन परिषदेचे उदघाटन
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला/प्रतिनिधी : आजच्या परीस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी शेतीमध्ये पारंपरिक सिंचनापेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादन वाढेल, पाण्याची बचत होईल, त्यामुळे नैसर्गिक स्त्रोताचे ही संवर्धन होईल.
हे स्पष्ट करून नदी जोड प्रकल्पासाठी राज्य सरकारची सकारात्मक भूमिका आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार तसा प्रयत्न करत आहे.
आगामी काळात महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
येथील सांगोला महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र सिंचन सहयोग या संस्थेच्यावतीने आयोजित एकविसाव्या महाराष्ट्र सिंचन परिषदच्या उदघाटन प्रसंगी मंत्री ना.विखे पाटील बोलत होते. यावेळी आ. डॉ.बाबासाहेब देशमुख,
माजी आ. शहाजी (बापू ) पाटील, जलसंपदा (लाक्षेवि) सचिव डॉ.संजय बेलसरे, महाराष्ट्र सिंचन सहयोग संस्थेचे अध्यक्ष डॉ.दि.मा.मोरे, या परिषदेचे स्वागताध्यक्ष तथा
सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबुराव(भाऊ) गायकवाड, मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ, राजेंद्र पवार, अभियंता अरुण कांबळे, प्रणव परिचारक, चेतनसिंह केदार, श्रीकांत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी सांगोला महाविद्यालयातील स्वयंमचलित हवामान केंद्र आणि लिफ्टचे उदघाटन ना. विखे पाटील यांनी केले. यावेळी डॉ.दि. मा. मोरे लिखीत पुस्तकाचे, डॉ. आ. गो. पुजारी यांनी संपादीत केलेल्या अंकाचे प्रकाशन झाले.
अकोला येथील किसान पाणी वापर संस्थेला विमलताई बेलसरे स्मृती पुरस्कार ना. विखे पाटील यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
ना. विखे पाटील पुढे म्हणाले, “राज्यातील सर्वच धरणातील पाणी क्षमता कमी होत आहे, ही क्षमता वाढविण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.
राज्य सरकार सिंचनाच्या बाबतीत सजग असल्यामुळे राज्याचे सिंचन क्षेत्र वाढत आहे.
सोलापूर जिल्ह्यामध्ये उजनी धरणाच्या पाणी वापराचे योग्य नियोजन व्हावे. सांगोला तालुक्यातील शंभर गावाच्या पाण्याचा प्रश्न शासनाने सोडविला आहे.
भविष्यात सांगोला तालुक्याच्या पाण्याचे योग्य ही पद्धतीने नियोजन केले जाईल असे त्यांनी सांगितले. राज्याला दुष्काळ मुक्त करण्यात महाराष्ट्रसिंचन परिषदेची भूमिका महत्वाची आहे,
या सिंचन परिषदेमध्ये पाणी व शेतीच्या प्रश्नावर चांगले विचार मंथन व्हावे, या परिषदेच्यावतीने आलेल्या सर्व सूचनांचे राज्य सरकार सकारात्मक विचार करेल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
या परिषदेचे स्वागताध्यक्ष बाबुराव(भाऊ) गायकवाड यांनी आपल्या भाषणामध्ये सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाच्या कार्याची ओळख करून दिली.
सांगोला तालुक्याला टेल टू हेड नियमित पाणी मिळावे अशी माफक मागणी त्यांनी ना. विखे पाटील यांचेकडे केली. जलसंपदा सचिव डॉ.संजय बेलसरे म्हणाले,
‘महाराष्ट्र सिंचन सहयोग शेतकऱ्यांनी काम करत आहे. आज या परिषदेमध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नावर विचार मंथन होत आहे. शेतकऱ्यांची मागणी विचारात घेऊन शेतीसाठीच्या पाणी वाटपा बाबत भविष्यात धोरणात्मक बदल केले जातील .
“हवामानातील दोलायमानता आणि सिंचन व्यवस्थापन” हा या दोन दिवसीय राज्यस्तरीय परिषदेचा विषय आहे. या सिंचन परिषदेमध्ये पहिल्या दिवशी ( दि.५ एप्रिल) रोजी राजेंद्र पवार (बारामती) तुषार जाधव (बारामती), डॉ. अशोक कडलग (पुणे),
डॉ. राहुल तोडमल, (बारामती) डॉ. बी.डी.जडे (जळगाव), सोमनाथ जाधव (जळगाव), संतोष डांगे (जळगाव), डॉ.सुरेश कुलकर्णी, हनुमंत देशमुख, लक्ष्मीकांत वाघावकर, गोवर्धन कुलकर्णी, राजेंद्र कासार (पुणे),
अनिल दडीच, ज्ञानदेव बोडके (माण) डॉ. विनोद पाटील, (उदगीर) सीमा जाधव (पुणे), शैलेद्र गाताडे (मालगाव), सुनील काटकर (कोल्हापूर), वंदना दाभाडे, केशवराव मिसाळ (सांगली), गोवर्धन ढोबळे (वाशीम),
डॉ. आ. गो. पुजारी (सांगोला) अरुणा शेळके, रावसाहेब पुजारी, बाळासाहेब मेटे, प्रा. डॉ. बी.डी. पाटील यांनी या परिषदेमध्ये आपली अभ्यासपूर्ण मांडणी केली. याचा लाभ उपस्थित शेतकऱ्यांनी घेतला.
महाराष्ट्र सिंचन सहयोगचे अध्यक्ष डॉ.दि. मा. मोरे यांनी प्रास्ताविकामध्ये सिंचन परिषदेच्या आयोजना मागील भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्र सिंचन सहयोग या संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे सर्व
पदाधिकारी व सदस्य, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, राज्यभरातून आलेले शेतकरी, पत्रकार या परिषदेला उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन प्रशांत आडे, प्रा.संतोष कांबळे यांनी केले.
महाराष्ट्र सिंचन सहयोगचे अध्यक्ष डॉ.दि. मा. मोरे, परिषदेचे स्वागताध्यक्ष बाबुराव (भाऊ) गायकवाड, सचिव ॲड. उदय(बापू) घोंगडे,
प्राचार्य डॉ.सुरेश भोसले, यांच्यासह दोन्ही संस्थेचे पदाधिकारी यांचे मागदर्शनाखाली प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व शेतकरी यांनी केले परिषदेचे नेटके नियोजन केले.
0 Comments