आमदार बाबासाहेब देशमुखांनी विद्यार्थ्यांचा प्रश्न तातडीने सोडवला
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ, सोलापूर च्या अंतर्गत घेतलेल्या B com, भाग 3 सेमिस्टर 5 च्या
परीक्षेच्या पेपर पुनर्मूल्यांकन ( Rechecking) संदर्भात काही विद्यार्थ्यांनी लोकप्रिय आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची भेट घेऊन
उत्तर पत्रीकेतील गुणांमध्ये तफावत आसल्याची तक्रार आमदार बाबासाहेब देशमुख यांच्याकडे प्रत्यक्षात भेटुन केली. उत्तर पत्रिकेतील झालेल्या चुकीची सविस्तर माहिती दिली विद्यार्थांनी आमदार साहेबांना सांगीतली
त्यावर आमदार बाबासाहेब देशमुख यांनी तातडीने विद्यापीठाच्या कुलगुरूंना संपर्क करून पुनर्मूल्यांकन ची तारीख वाढवून देण्यास सांगितले व त्या मागणीचे पत्र विद्यापीठाला दिले....
आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीची विद्यापीठ प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पेपर पुनर्मूल्यांकन करण्याची तारीख वाढवून देण्यात आली.
आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नांना यश आल्याने विद्यार्थी व पालक हे खुष झाले असुन आमदार साहेबांनी हा प्रश्न तात्काळ मार्गी लावल्याने विद्यार्थी व पालक वर्गातुन आमदार बाबासाहेब देशमुख यांचे कौतुक होताना दिसत आहे.
आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख हे विद्यार्थ्यांच्या सदैव पाठीशी असणारे नेतृत्व असल्याची माहीती भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली
0 Comments