सांगोला शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी
पो. नि. घुगे ॲक्शन मोडवर पहिल्याच दिवशी नूतन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचा कारवाईचा दणका
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला / तालुका प्रतिनिधी सांगोला शहर आणि तालुक्यात ढासळलेली कायदा सुव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी पहिल्याच दिवशी पोलीस निरीक्षक विनोद घुगे चांगलेच ॲक्शन मोडवर आले आहेत. मंगळवार दि. २२ एप्रिल रोजी
सांगोला शहरातील मुख्य रस्त्यांवर अनेक ठिकाणी अतिक्रमण करून किरकोळ व्यापारी हातगाडे धारक तसेच डिजिटल बोर्ड रस्त्यावर लावलेली दुचाकी
आणि चारचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई करून चार्ज स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी कारवाईचा दणका दिला आहे.
सांगोला तहसील कार्यालयापासून ते कचेरी रोड, पुढे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक, जय भवानी चौक, सांगोला नगरपरिषद ते स्टेशन रोड महात्मा फुले चौक वासुद चौक या परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला असंख्य हातगाडे,
फळांचे भाज्यांचे स्टॉल, दुचाकी आणि चारचाकी वाहने लावून वाहतुकीला अडथळा करत होती. यामुळे अनेकवेळा किरकोळ अपघातही झाले होते आणि वाहतुकीला अडचणी येत होत्या
नागरिकांच्या सोयीसाठी पहिल्याच दिवशी संपूर्ण पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा फौजफाटा घेऊन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी सर्व किरकोळ व्यापाऱ्यांना रस्त्याच्या बाजूला असणारी अतिक्रमणे दोन दिवसाच्या
आत हटविण्याच्या सूचना केल्या दोन दिवसात रस्ता वाहतुकीला खुला न केल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही असा सज्जड इशाराही यावेळी नूतन पोलीस निरीक्षक घुगे यांनी दिला.
0 Comments