google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक घटना...विठ्ठल पावला! घरात 18 विश्वे दारिद्र्य, पंढरपुरातील महिलेला लाखोंची लॉटरी; आनंद गगनात मावेना

Breaking News

खळबळजनक घटना...विठ्ठल पावला! घरात 18 विश्वे दारिद्र्य, पंढरपुरातील महिलेला लाखोंची लॉटरी; आनंद गगनात मावेना

खळबळजनक घटना...विठ्ठल पावला!


घरात 18 विश्वे दारिद्र्य, पंढरपुरातील महिलेला लाखोंची लॉटरी; आनंद गगनात मावेना 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

घरात अठरा विश्वे दारिद्र्य असलेल्या पंढरपुरातील एका महिलेला लाखोंची लॉटरी लागल्याची घटना समोर आली आहे. 

संबंधित महिलेला लॉटरी लागताच महिलेसह तिच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

ही महिला मेहतर समाजातील आहे. पिढ्यानपिढ्या गरिबी अनुभवलेल्या मेहतर समाजातील महिलेला लॉटरी लागल्याने तिला विठुराया पावल्याची चर्चा आहे.

मनिषा वाघेला असं या महिलेचं नाव असून तिला २१ लाखांची लॉटरी लागली आहे. लॉटरी लागल्यानंतर आता मनिषा वाघेला सहकुटुंब वृंदावन येथे जाऊन प्रेमानंद महाराजांची भेट घेणार आहेत. एका गरीब महिलेला अशाप्रकारे लॉटरी लागल्याने अनेकांना आनंद झाला आहे.

खरं तर, मेहतर समाज शेकडो वर्षांपासून मैला उचलण्याचं काम करतो. सुप्रीम कोर्टाने 1993 साली याला कायद्यानुसार गुन्हा ठरवलं, तरीदेखील या समाजाकडून हे काम करुन घेतलं जातं. परंतु सरकारने पावले उचलली आणि मेहतर समाजाची या कामातून सुटका झाली.

याच मेहतर समाजातील महिलेला अचानक २१ लाखांची लॉटरी लागली आणि साक्षात विठुरायाच पावल्याची भावना मनिषा वाघेला यांची आहे. यामुळे कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

मनिषा वाघेला या घरकाम करतात. त्यांनी पंढरपुरातील गोपाळ कृष्ण मंदिराजवळील शोभा लॉटरी सेंटरमधून लॉटरी तिकीट खरेदी केलं होतं. त्यावर चक्क २१ लाख रुपयांची लॉटरी लागली आहे.

रामनवमी उत्सव मिरवणूक सुरू असतानाच पिढ्यानपिढ्या अत्यंत गरीब अवस्थेत जगणाऱ्या मेहतर समाजाचा आनंद साक्षात विठुरामच पावला असं वाटत होते.

Post a Comment

0 Comments