google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज..मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला अटक

Breaking News

ब्रेकिंग न्यूज..मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला अटक

ब्रेकिंग न्यूज..मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला अटक


सातारा – मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला १ कोटींची खंडणीची रक्कम स्वीकारताना अटक केली आहे. 

सातारा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेने हे प्रकरण मिटवण्यासाठी ३ कोटी रुपयांची मागणी केली होती.

सातारा स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत मंत्री गोरेंवर आरोप करणाऱ्या माहिलेला अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या महिलेने मंत्री गोरेंवर गंभीर आरोप केले होते. 

त्यानंतर सभागृहात मंत्री गोरेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती. मात्र आता याच महिलेने प्रकरण मिटवण्यासाठी ३ कोटी रुपयांची मागणी केली होती 

आणि त्यापैकी १ कोटींची खंडणी स्वीकारताना सातारा स्थानिक गुन्हे शाखेने महिलेला रंगेहात पकडलं आहे. माहितीनुसार सध्या महिला सातारा पोलिसांच्या ताब्यात असून पोलिसांकडून महिलेची कसून चौकशी करण्यात येत आहे.

 जयकुमार गोरे यांनी २०१७ मध्ये मानसिक त्रास देण्यासाठी स्वतःचे नग्न फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवले असा आरोप या महिलेने केला होता.

 या प्रकरणात गोरे यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्याता आला होता. त्यानंतर अटक टाळण्यासाठी जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 

मात्र, न्यायालयाने अटकूपर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर जयकुमार गोरे यांना अटक होऊन दहा दिवस जेलमध्ये रवानगी करण्यात आली होती.

 त्यामुळे त्यांना जामीन मिळाला होता. मात्र २०१९ मध्ये या प्रकरणात न्यायालयाने निकाल देत गोरे यांना निर्दोष मुक्त करत जप्त केलेला मुद्देमाल आणि मोबाईल नष्ट करण्याचे आदेश गोरे यांना न्यायालयाने दिले होते.

मंत्री विवस्त्र फोटो महिलेला पाठवतो. १० दिवस जेलची हवा खाऊन येतो. तसेच १० हजार रुपयांचा न्यायालयाचा दंड भरतो.

 आणि पुन्हा महिलेला ब्लॅकमेल करायला लागतो असा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. पण, आता ही महिलाच खंडणी प्रकरणात सापडली आहे.

Post a Comment

0 Comments