google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज! पुणे पुन्हा हादरले पत्नीच्या चारित्र्याच्या संशय घेऊन आय टी इंजिनियर बापाने साडे तीन वर्षाच्या मुलाचा केला खून

Breaking News

ब्रेकिंग न्यूज! पुणे पुन्हा हादरले पत्नीच्या चारित्र्याच्या संशय घेऊन आय टी इंजिनियर बापाने साडे तीन वर्षाच्या मुलाचा केला खून

ब्रेकिंग न्यूज! पुणे पुन्हा हादरले पत्नीच्या चारित्र्याच्या संशय घेऊन


आय टी इंजिनियर बापाने साडे तीन वर्षाच्या मुलाचा केला खून

पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन आय टी इंजिनियर बापाने आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा गळा कापून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

हिम्मत माधव टीकेटी (वय साडे तीन वर्षे) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. चंदननगर पोलिसांनी मुलाच्या वडिलांना अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,

 टीकेटी कुटुंब मूळचे विशाखापट्टणमचे आहेत. माधव याला आपल्या पत्नीच्या चारित्र्याचा संशय होता. काल दुपारी पती,पत्नीत भांडणे झाली. 

पती मुलाला घेऊन घराबाहेर गेला. एका बारमध्ये दुपारी बसला. तेथून साडे बारा वाजता बाहेर पडला. तेथून सुपर मार्केटमध्ये गेला. त्यानंतर चंदननगर येथील जंगलात गेला. 

रात्री त्याची पत्नी चंदननगर पोलिस ठाण्यात आली. पती आणि मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून त्यांचा माग काढला.

 पहाटे तो चंदननगर जवळील जंगलात दारूच्या नशेत सापडला. त्याला मुलगा कोठे आहे विचारल्यावर त्याने मारून टाकले, असे सांगितले. पोलिसांनी जंगलात शोध घेतल्यावर तेथे मुलाचा गळा कापल्याचे दिसून आले.

Post a Comment

0 Comments