धक्कादायक! नराधम बापाचा अल्पवयीन मुलीवर चार महिन्यांपासून अत्याचार जत तालुक्यातील घटना..
जत : जतपूर्व भागातील एका गावात मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली. 13 वर्षांच्या लेकीवर बापानेच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
या नराधम बापावर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 अंतर्गत रात्री उशिरा उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मुलीच्या असाहाय्यतेचा फायदा घेत जन्मदात्या बापानेच तिच्यावर अत्याचार केले. चार महिने हा प्रकार सुरू होता. ही घटना लक्षात येताच मुलीच्या आईने पतीला वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला; परंतु तो ऐकत नव्हता.
अखेरीस शुक्रवारी सकाळी तिने उमदी पोलिस ठाण्यात धाव घेऊन महिला अंमलदारांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ कार्यवाही करत त्याला गजाआड केले. पोलिसांनी पीडितेसह तिच्या आईचा जबाब नोंदविला आहे.
यावेळी पीडित मुलीने अधिकार्यांसमोर बापाच्या अत्याचाराबाबत माहिती दिली. या अत्यंत गंभीर घटनेची तत्काळ दखल घेत उमदी पोलिसांनी नराधम बापास ताब्यात घेतले. मात्र केलेल्या या निर्दयी कृत्याचा त्याच्या चेहर्यावर लवलेशही नव्हता.
0 Comments