google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..पोलिसाच्या ड्रेस मध्ये श्लोक ला अखेरचा निरोप.. सांगोला तालुक्यातील घटना..

Breaking News

खळबळजनक..पोलिसाच्या ड्रेस मध्ये श्लोक ला अखेरचा निरोप.. सांगोला तालुक्यातील घटना..

खळबळजनक..पोलिसाच्या ड्रेस मध्ये श्लोक ला अखेरचा निरोप.. सांगोला तालुक्यातील घटना..


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

नाझरा(वार्ताहर)..:- .”बाळा तू मोठेपणी काय होणार”? असा प्रश्न कुणी विचारू द्या.. चार वर्षाचा श्लोक संतोष बाबर त्यांना उत्तर द्यायचा “मी मोठेपणी पोलीसच होणार..!” कसाही प्रश्न विचारू द्या आपल्या बोबड्या बोलीत 

अतिशय चुणचणीतपणे उत्तर देऊन प्रत्येकाच्या मनात घर करणारे श्लोक गेल्या वर्षभरापासून मेंदूच्या आजाराने त्रस्त होता. गावकऱ्यांचं अनेक आणि त्याच्या उपचारासाठी प्रयत्नांची पराकष्टा केली 

पण आज पहाटे त्याची प्राणज्योत मावळली. पोलीस गणवेशात हातात खेळण्यातली बंदूक देऊन आज श्लोक वर अंत्यसंस्कार होताना उपस्थित चोपडीकरांचे डोळे पानावले होते.

श्लोक संतोष बाबर वय वर्ष 4 चोपडी गावातील गणेश नगर येथील अंगणवाडीत मदतनीस म्हणून काम करणाऱ्या ताईंचा मुलगा..त्याच अंगणवाडीत शिकत होता. 

अतिशय चुणचणीत असणारा हा गोड मुलगा गेल्या वर्षभरापासून मेंदूच्या आजाराने त्रस्त होता. कोल्हापूर पासून ते पुणे,मुंबई अशा विविध ठिकाणी त्याच्यावर उपचार केले

 परंतु सगळे उपचार अयशस्वी ठरले. संतोष बाबर हे एका खाजगी शिक्षण संस्थेत तुटपुंजा पगारावरती नोकरी करत असल्याने आपल्या मुलाच्या उपचारी करता त्यांनी चोपडीकरांना मदतीचे आव्हान केले, 

तेव्हा गावकऱ्यांनी अगदी आठवड्याभरात त्याच्या उपचारासाठी पाच ते सहा लाखाचा निधी जमवला. तो लवकर बरा व्हावा यासाठी अनेकांनी देवाकडे पूजा अर्चा केली. 

त्याचा हसरा चेहरा अनेकांच्या मनात कायम घर करून राहणारा होता.अखेर आज पहाटे त्याची प्राणज्योत मावळली. चोपडी परिसरातील असंख्य ग्रामस्थांनी महिलांनी त्या चिमुकल्याचा अखेरचे दर्शन घेतलं.

 “मी पोलीसच होणार”या त्याच्या ध्येयाचे सगळीकडे कौतुक व्हायचे. अखेर त्याला आज पोलीस ड्रेस चढवला आणि अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला. समोरच्या व्यक्तीच्या मनात काही क्षणात स्थान निर्माण करणारा हा श्लोक आपल्यातून कायमचा निघून गेला 

यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. श्लोक ज्या वस्तीत राहतो त्या वस्तीच्या जवळपासच त्याच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले.”मी पोलीसच होणार!” या चिमुकल्याच्या ध्येयाचा अंत अनेकांच्या मनाला चटका लावून गेला.

चौकट करणे:- श्लोक च्या उपचारासाठी चोपडी व परिसरातील असंख्य ग्रामस्थांनी आर्थिक सहाय्य केले होते. श्लोकचा हसरा चेहरा सर्वांना बघायला मिळावा यासाठी प्रत्येक जण आतुरलेला होता,परंतु आज सकाळी अचानक श्लोक च्या जाण्याची बातमी कानावरती आली 

आणि खूपच अस्वस्थ वाटू लागले. घरातील हसरं खेळत बाळ मेंदूच्या आजाराने गेल्याने बाबर कुटुंबियांवर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यातून सावरण्याची शक्ती ईश्वर त्यांना देवो…. श्री गणेश बाबर (चोपडी)

Post a Comment

0 Comments