संपूर्ण तालुक्यात सामाजिक उपक्रम राबवून कार्यतपस्वी स्व.आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला / तालुका प्रतिनिधी सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते आणि कार्यतपस्वी आमदार स्व. काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून सांगोला शहर आणि संपूर्ण तालुक्यात शुक्रवार दि २८ मार्च रोजी विविध कार्यक्रम पार पडले.
आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन करताना ५२ वर्षानंतरही सामाजिक उपक्रम राबवून खऱ्या अर्थाने त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे काम सांगोला तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी केले आहे.
दरवर्षी स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या पुण्यतिथीनमित्त संपूर्ण सांगोला शहर आणि तालुक्यात विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबविले जातात.
त्याचप्रमाणे यंदाही शुक्रवारी दिवसभर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महूद बु. येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महुद येथील
विद्यार्थ्यांना महूद ग्रामस्थांच्या वतीने शालेय साहित्यांचे व खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते जयवंत नागणे गुरुजी, कैलास खबाले, धनंजय पाटील, विठ्ठल बागल ,अंगद जाधव, यशवंत खबाले ,अभिषेक कांबळे,
बाबुराव नागणे, दिलीप नागणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच एखतपुर ग्रामस्थांच्या वतीनेही एखतपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मधील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप केले
यावेळी नवनाथ इंगोले, निवास जाधव, प्रशांत इंगोले, दादासो इंगोले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. तर जवळा ग्रामस्थांच्या वतीने प्राथमिक मुलांची शाळा क्र. १ येथे समस्त ग्रामस्थांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात जवळा व पंचक्रोशीतील हजारो सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांनी आरोग्य तपासणी केली यावेळी युवा नेते ॲड. यशराजे साळुंखे पाटील, माजी सभापती साहेबराव देशमुख, सरपंच सज्जन मागाडे, चंद्रकांत शिंदे, पंडित साळुंखे,
माजी सरपंच सुषमा घुले, यांच्यासह जवळा ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या महाआरोग्य शिबिरात सांगोला शहर आणि तालुक्यातील असंख्य तज्ञ डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा बजावली.
घेरडी ग्रामस्थांच्या वतीने घेरडी येथील आश्रमशाळा तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मधील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी सरपंच दिलीप मोटे, भाऊसाहेब यमगर,
शामराव पोळ, कय्युम आत्तार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कडलास ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी जेष्ठ नेते सुनील गायकवाड,
गिरीश गायकवाड आदी उपस्थित होते. नाझरे ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, खाऊ आणि फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी बसवेश्वर आदाटे,
नागेश रायचुरे, पांडुरंग वाघमारे, संभाजी हरिहर,सुरेश काका देशपांडे, रफिक काझी, ओंकार देशपांडे , इम्रान काझी, झाडबुके गुरुजी, यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
शुक्रवार दि २८ मार्च रोजी कोळा ग्रामस्थांच्या वतीने गोपाळपूर ता. पंढरपूर येथील मातोश्री आश्रमात असणाऱ्या सर्व निराधार लोकांना मोफत आणि रुचकर भोजन देण्यात आले. कोळा येथील ग्रामस्थांनी गोपाळपूर येथे जाऊन येथील
आश्रमात असणाऱ्या सर्व निराधार लोकांना मायेचा घास भरवला. तर सांगोला शहरवासीनी शहरातील मातोश्री वृद्धाश्रम येथे असणाऱ्या निराधार वयोवृद्ध नागरिकांना भोजनाचे सर्व साहित्य दिले
यावेळी जेष्ठ नेते तानाजीकाका पाटील, शिवाजीनाना बनकर, अनिलनाना खटकाळे, सोमनाथ लोखंडे, अनिल खडतरे, रवी चौगुले आदींसह नागरिक उपस्थित होते.
संपूर्ण सांगोला शहर आणि तालुक्यात स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त साळुंखे पाटील परिवारावर प्रेम करणाऱ्या
तमाम कार्यकर्त्यांनी गावोगावी प्रतिमापूजन करून, शालेय साहित्य वाटप करून आणि वृक्षारोपण सारखे सामाजिक उपक्रम राबवून आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन केले.
चौकट ;
तर, सांगोल्याचा चेहरा मोहरा बदलून गेला असता..!
स्व. काकासाहेब साळुंखे पाटील हे विकासाचा व्यापक दृष्टिकोन असणारा दृष्टा नेता होते. १९६० च्या दशकात त्यांनी सांगोला तालुक्यातील पाणी प्रश्नाची दाहकता ओळखली होती. म्हणूनच सांगोला तालुक्याला पाणी मिळावे म्हणून सर्वात प्रथम त्यांनी प्रयत्न केले.
त्यांची विकासाची दृष्टी सामान्य नागरिकांशी जोडलेली नाळ यामुळेच येथील जनतेने ५० वर्षापूर्वी त्यांना कार्यातपस्वी ही पदवी दिली होती. स्व. काकासाहेबांना आणखी १० वर्षे आयुष्य लाभले असते तर सांगोल्यावर दुष्काळाचा कलंक लागलाच नसता.
तानाजीकाका पाटील,
ज्येष्ठ नेते, सांगोला.
0 Comments