google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक घटना..सांगोल्यात शॉर्टसर्किटमुळे इलेक्ट्रिक वस्तू फर्निचर व घरगुती वापराचे साहित्य जळून खाक

Breaking News

खळबळजनक घटना..सांगोल्यात शॉर्टसर्किटमुळे इलेक्ट्रिक वस्तू फर्निचर व घरगुती वापराचे साहित्य जळून खाक

खळबळजनक घटना..सांगोल्यात शॉर्टसर्किटमुळे इलेक्ट्रिक वस्तू फर्निचर व घरगुती वापराचे साहित्य जळून खाक  


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला शहरातील स्टेशन रोडवरील मध्यवस्तीत असलेल्या बाळासाहेब जगदाळे यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर अचानक आग लागल्याने घरातील फर्निचर, कपडे व इलेक्ट्रिक वस्तू जाळून लाखोंचे नुकसान झाले. 

ही घटना शनिवार दी. २१ मार्च रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास घडली असून नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ आग आटोक्यात आणल्याने मोठे नुकसान टळले. 

याबाबतचे वृत्त असे की बाळासाहेब कृष्णाजी जगदाळे रा. स्टेशन रोड, सांगोला यांचे मध्यवस्तीत असलेल्या दुमजली घराच्या वरच्या मजल्यावर अचानक आग लागून धुराचे लोट बाहेर येता असल्याचे दिसून आले.

यावेळी घरामध्ये लहान मूल व दोन महिलाच असल्याने त्यांनी घरातील दोन गॅस टाक्या बाहे काढत मीटर पासूनच विद्युत पुरवठा बं केला.

 दरम्यान वरच्या मजल्यावर असलेल्य टिव्ही व फर्निचर ने पेट घेतल्याने शेजारी असणाऱ्या दोन इमारतींना व मोबाईल शॉपिला धोका होऊ शकला असता. 

परंतु प्रसंगी मदतीला आलेले प्रवीण गायकवाड, शहीद जवान संघटनेचे अध्यक्ष नीलकंठ शिंदे यांनी तत्काळ अग्निशामक दलच्या गाडीला फोन केला.

 तर वायरमन हंबीरराव शेळके यांनी लागलीच जवळपासचा विद्युत पुरवठ बंद केला. यावेळी अग्निशामक दलाचे चालक संतोष सरगर फायरमन असिफ काझी यांनी मोठ्या हिमतीने आगीव तत्काळ नियंत्रण आणले.

तर वायरमन हंबीरराव शेळके यांनी लागलीच अजू बाजूच्या घराचा विद्युत पुरवठा बं करून सहकार्य केल्याने मोठा अनर्थ टाळला. 

परंतु झालेल्य आगीत जगदाळे यांच्या घरातील कपडे, फर्निचर व टिव्ही जाळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले होते.

Post a Comment

0 Comments