google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय मध्ये शहीद दिन साजरा.

Breaking News

डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय मध्ये शहीद दिन साजरा.

डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय मध्ये शहीद दिन साजरा. 


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला अंतर्गत नियोजित व नियोजित समिती तसेच राष्ट्रीय छात्र सेना यांचे मार्फत 23 मार्च हा दिवस शहीद दिन म्हणून साजरा करण्यात आला.

 अखंड हिंदुस्तानास इंग्रजांपासून मुक्ती मिळावी या हेतूने भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी दिलेला इंग्रजा विरोधातील लढा हा इतिहास वाचत असताना

 अंगावर शहारे आणणारा असून एनसीसी स्वयंसेवकांनी प्रेरणा घ्यावी आणि प्रेरित होऊन क्रांती घडवावी, असे प्रतिपादन प्राध्यापक डॉ. रिटे सर यांनी त्यांच्या मनोगत मध्ये व्यक्त केले. 

पुढे एनसीसी विभाग प्रमुख डॉ. ठोंबरे सर यांनी शहीद दिनाचे महत्त्व सांगून भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांनी केलेला संघर्ष तसेच इतिहासातील काही घटनांचा उल्लेख करून थोर महापुरुषांचे इंग्रज लढ्यातील महत्त्व पटवून दिले. 

सदर शहीद दिनानिमित्त महाविद्यालयातील एनसीसी स्वयंसेवक,विद्यार्थी - विद्यार्थिनी, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिकंदर मुलाणी सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments