खळबळजनक...बुद्धेहाळ येथे वन कर्मचाऱ्यास चारजणांकडून मारहाण सांगोला :
वनक्षेत्राभोवती सिमेंट पिलर्स घालण्याचे काम
चालू असताना दुचाकीवरून आलेल्या चौघांनी मिळून वन कर्मचाऱ्यासह बांधकाम मिस्त्रीला शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
वन कर्मचाऱ्यांच्या शर्टाची कॉलर पकडून त्यांच्या गालावर ओरबडून तुम्हाला येथे काम करू देणार नाही,
असे म्हणून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास बुद्धेहाळ (ता. सांगोला) येथील बनकार्यक्षेत्रात घडली आहे.
बुद्धेहाळ (ता. सांगोला) येथील फॉरेस्ट गट नंबर-३०९ वनक्षेत्राभोवती सिमेंट पिलर्स घालण्याचे काम चालू होते.
त्यावेळी दोन दुचाकीवरून आलेल्या चार व्यक्तींनी कामगार मिथुन रमेश राठोड यास तुम्ही येथे काम करायचे नाही,
तुझा येथे काय संबंध म्हणून त्याला दमदाटी करू लागले. त्यावेळी फिर्यादी झाडाखाली जेवण करीत होता म्हणून त्यांनी काय गोंधळ चालू आहे म्हणून तो पाहण्यासाठी त्या ठिकाणी गेला
असता त्या लोकांनी तुम्ही कोण, तुम्ही हे चालू असलेले काम का थांबवत आहात असे विचारले असता
त्यांनी फिर्यादीला तू कोण आम्हाला ओळखत नाही का, हे काम तुम्ही करायचे नाही असे म्हणून दमदाटी केली.
त्यानंतर फिर्यादीने वनक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांना याबाबत फोन करून माहिती दिली असता थोड्यावेळाने शासकीय वाहनाने गोवर्धन व्हरकाटे, सचिन जाधवर,
संजय वाघमोडे व जहांगीर खोंदे यांनी येऊन वरील लोकांनी तुमची काय अडचण आहे, तुम्ही चालू असलेले काम का बंद केले, तुमची जी काय अडचण आहे ते तुम्ही आमच्या वरिष्ठांना सांगोला येथे येऊन सांगा
व लिखित स्वरूपात तक्रार द्या, असे म्हणाले असता वरील चौघांनी फिर्यादीसह कर्मचारी यांना शिवीगाळ करून फिर्यादीच्या शर्टाची कॉलर पकडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून निघून गेले आहेत.
याबाबत वनसंरक्षक आनंदा कृष्णा करांडे (रा. जुनोनी कोळे ता. सांगोला) यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी नामदेव माणिक जाधव (रा. ममदाबाद हुन्नूर, ता. मंगळवेढा) याच्यासह इतर तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला.
0 Comments