google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..सांगोला तालुक्यातील ३ लाख ७७ हजार जनावरांना मुरघास चां आधार

Breaking News

मोठी बातमी..सांगोला तालुक्यातील ३ लाख ७७ हजार जनावरांना मुरघास चां आधार

मोठी बातमी..सांगोला तालुक्यातील ३ लाख ७७ हजार जनावरांना मुरघास चां आधार  


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला:- सांगोला शहर व तालुक्यात उन्हाचा चटका चांगलाच जाणवू लागला आहे. परिणामी शेतातील पिके उन्हामुळे करपू लागली आहेत. यामध्ये जनावरांच्या चारा टंचाईचा प्रश्नही उद्भवणार आहे. 

सध्या हिरव्या चाऱ्याचा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत असताना, जनावरांसाठीच्या चाऱ्याची समस्या गंभीर होत आहे. आता उन्हाळ्यात तर हिरव्या चाऱ्याची उपलब्धता अत्यंत कमी असते. 

मात्र अनेक शेतकरी अभ्यासवृत्तीतून आगामी उन्हाळा आणि पावसाळा कालावधीत संतुलित चारा उपलब्ध होण्यासाठी उत्कृष्ट नियोजन करण्यात कुशल झाले आहेत.

मुरघास हा पर्याय शेतकरी बांधवांनी निवडला असून, तालुक्यातील ३ लाख ७७ हजार जनावरांसाठी मुरघास हा चारा फायदेशीर ठरत आहे. 

कमी पर्जन्यमान असणाऱ्या सांगोला तालुक्यात शेती उद्योग व्यवसायाबरोबर जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय येथील शेतकऱ्यांनी स्वीकारला आहे.

 यामध्ये लाखो रुपयांच्या जर्सी गाई खरेदी करून दूध उत्पादनावर येथील शेतकऱ्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह आर्थिक देवाण-घेवाण आणि व्यवहार सुरू ठेवले आहेत. 

पशु विभागांतर्गत मिळालेल्या अधिक माहितीनुसार तालुक्यात लाख ४७ हजार मोठी जनावरे आहेत. तर २ लाख ३० हजार लहान असे एकूण ३ लाख ७७ हजार जनावरांची संख्या आहे. 

या जनावरांना उन्हाळ्यात चारा टंचाई जाणवते. ओला नव्हे तर वाळलेला मिळणे मुश्कील असते. अशा टंचाई परिस्थितीत जनावरे जगविण्यासाठी शेतकऱ्यांची भिस्त मूरघास यावर अवलंबून आहे. 

यंदा कडक उन्हाळ्याची चाहूल ओळखून पुढील तीन महिने हिरव्या चाऱ्याची उपलब्धता होण्यासाठी त्यांनी आदर्श नियोजन केले आहे. 

मका या पिकातून मूरघास तयार करून शेतकरी चारा टंचाईवर मात करीत आहेत. यामुळे तालुक्यात मका पिक उत्पादनात झाली आहे. पूर्वी कडक उन्हाळा सुरू झाला की जनावरांसाठी चारा छावणी सुरू व्हायची.

 मात्र आता वार्षिक वैरण गरज ओळखून येथील शेतकऱ्यांनी मुरघास निर्मिती वर अधिक भर दिला आहे. चिकात आलेला मका निवडून यंत्राच्या मदतीने त्याचे तुकडे केले जातात. 

गुणवत्तापूर्ण व जलद मुरघास तयार होण्यासाठी उपयुक्त जिवाणू घटकांच्या मिश्रणाचा वापर होतो. सदर मूरघास बॅग मध्ये भरून ठेवली जाते. आणि टंचाई काळात जनावरांना चारा म्हणून वापर केला जात आहे. 

यामुळे तालुक्यातील बहुतांश शेतकरी जनावरांसाठी मूरघास हाच पर्याय निवडताना दिसून येत आहेत. यामध्ये सांगोला तालुक्यातील ३ लाख ७७ हजार जनावरांना मुरघास चां आधार मिळतो आहे.

Post a Comment

0 Comments