उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिरीष महाराजांच्या मदतीला धावले कुटुंबीयांना आधार देत फेडले
३२ लाखाचे कर्ज, महाराजांची शेवटची इच्छा पूर्ण, काय होती ‘ती’ इच्छा
पुणे – जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज प्रसिद्ध हभप शिरीष महाराज मोरे यांनी आर्थिक विवंचनेतून ५ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती. त्यांच्यावर ३२ लाखाचे कर्ज होते.
पण आता त्यांचे हे ३२ लाख रूपयांचे कर्ज उतरणार आहे. कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरीष महाराजांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात दिला आहे.
शिरीष महाराज यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत आपल्यावर ३२ लाखांचे कर्ज झाले असून ते फेडणे शक्य होत नसल्याने टोकाचे पाऊल उचलत असल्याचे लिहिले होते.
आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची आर्त विनवणी शिरीष महाराज मोरे यांनी आपल्या मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रातून सर्व मित्रमंडळींना केली होती.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोरे कुटूंबाला मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे त्यांना ३२ लाख रुपयांची मदत करणार आहे.
आमदार विजय शिवतारे यांना शिंदेंनी काल शिरीष महाराज मोरे यांच्या घरी जाऊन ही मदत त्यांच्या कुटूंबियांना सुपूर्द केली आहे. एकनाथ शिंदे यांनी ३२ लाख रुपयांची आर्थिक मदत दिल्याने शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान शिरीष महाराजांनी लिहिलेल्या चिठ्ठीतील मजकुरानुसार त्यांच्यावर ३२ लाख ३५ हजारांचे कर्ज होते. मुंबईतील सिंघवजींचे १७ लाखाचे, बचत गटाचे ४ लाखांचे, सोने गहाण ठेवलेले त्याचे १ लाख ३० हजार, वैयक्तिक कर्ज २ लाख २५ हजार, चारचाकी वाहन ७ लाखाचे कर्ज
आणि किरकोळ देणी ८० हजार असे एकूण ३२ लाख ३५ हजारांचे कर्ज होते. शिरीष महाराजांनी एकदा सांगितलं असतं, तर अख्खा महाराष्ट्र त्यांच्या मदतीला धावला असता, असे मत देहूमधल्या लोकांनी व्यक्त केले होते.
आत्महत्येच्या २० दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता. एप्रिल महिन्यात त्यांचं लग्न होणार होते. मात्र त्यांनी घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे त्यांच्या कुटुंबियांना तसेच नातेवाईकांना मोठा धक्का बसला होता.
शिरीष महाराजांनी आत्महत्येच्या आधी लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारावर देहूरोड पोलीस पुढील तपास करत आहेत.
0 Comments