google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज..सांगोला शहर बनले गुटखा विक्रीचे केंद्र

Breaking News

ब्रेकिंग न्यूज..सांगोला शहर बनले गुटखा विक्रीचे केंद्र

ब्रेकिंग न्यूज..सांगोला शहर बनले गुटखा विक्रीचे केंद्र



सांगोला : सांगोला शहर हे गुटखा विक्रीचे मध्यवर्ती केंद्र असून गुटखा साठवण्याचे गोदामदेखील शहरांमध्ये आहेत. काही घरांमध्येदेखील गुटखा साठवून ठेवला जातो. गोळी बिस्कीट विक्रीच्या नावाखाली गुटख्याचा धंदा फोफावला आहे.

यापूर्वी अनेक वेळा शहरात गुटखा विक्री करणार्‍या दुकानांवर धाडी टाकून लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला होता. मात्र सांगोला शहरातील गुटखा विक्रीचे केंद्र काही बंद झाले नाही.

 शहरात गुटखा विक्री करणारा मुख्य सूत्रधार असून त्यांच्यामार्फत शहरामधील पान टपर्‍या किराणा, दुकानदार यांना मोटारसायकल व सायकलवरून पुरवठा केल्या जातो.

 महाराष्ट्र शासनाने गुटखा विक्रीवर बंदी टाकलेली असतानाही शहरात मात्र सर्रास विक्री केली जात असताना अन्न व भेसळ विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.

शाळेत जाणारी मुले व युवा पिढी गुटखा खाऊन त्यांचे आरोग्य बिघडत चालले आहे. आरोग्यासाठी धोकादायक असणारा गुटखा शहरात सहजरीत्या कुठेही मिळू लागल्याने युवा पिढी व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 

शहरातील तेजीत सुरू असलेला गुटखा यावर अन्न व भेसळ यंत्रणेने नियंत्रण ठेवून हा धंदा करणार्‍यांवर पायबंद घालावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Post a Comment

0 Comments