google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आश्चर्य..! माणसाला लावली डुकराची किडनी, ऑपरेशननंतर रुग्णही ठणठणीत; डॉक्टरांची कमाल

Breaking News

आश्चर्य..! माणसाला लावली डुकराची किडनी, ऑपरेशननंतर रुग्णही ठणठणीत; डॉक्टरांची कमाल

आश्चर्य..! माणसाला लावली डुकराची किडनी, ऑपरेशननंतर रुग्णही ठणठणीत; डॉक्टरांची कमाल


मूत्रपिंडाच्या समस्येचा सामना करणाऱ्या लोकांसाठी डॉक्टरांनी क्रांतीकारी कामगिरी केली आहे.

 न्यू हॅम्पशायरमधील डॉक्टरांनी डुकराची किडनी जनुकीय बदल करून एका ६६ वर्षीय व्यक्तीला यशस्वीरित्या प्रत्यारोपित केली.

ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर रुग्णाला काही दिवस रुग्णालयात ठेवण्यात आले होते.

 रुग्णाच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत असल्याने आठवडाभरानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. सध्या तो कोणत्याही समस्येशिवाय आपल्या घरात राहत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी २५ जानेवारी रोजी ६६ वर्षीय टिम अँड्र्यूज यांच्यावर शस्त्रक्रिया केली होती. टिम गेल्या दोन वर्षांपासून मूत्रपिंडाच्या समस्येने त्रस्त होता. 

टिम सतत किडनी डोनरच्या शोधात होता पण त्याला एकही सापडला नाही. टिमच्या म्हणण्यानुसार, किडनी डोनर शोधण्यासाठी त्याला सुमारे सात वर्षे लागली असती. पण या समस्येमुळे

 त्यांना सतत हृदयाशी संबंधित समस्या आणि डायलिसिसच्या गुंतागुंतीचा सामना करावा लागत होता, 

ज्यामुळे त्यांच्या जगण्याची शक्यता कमी होती. टिमला जेव्हा या प्रयोगाची माहिती मिळाली तेव्हा त्याने आनंदाने त्याला मान्यता दिली.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, शस्त्रक्रियेनंतर थोड्याच वेळात मूत्रपिंड व्यवस्थित काम करू लागले. 

मूत्रपिंड कोणत्याही प्रकारच्या निकामी होण्याची चिन्हे दिसली नाहीत. आधीच मधुमेहाने त्रस्त असलेल्या टिमसाठी ही शस्त्रक्रिया दिलासा देणारी होती.

याआधीही झाले आहेत असे प्रयोग -

डुकराचे जनुकीयदृष्ट्या मानवात प्रत्यारोपण करण्याची ही पहिलीच घटना होती. यापूर्वी करण्यात आलेल्या काही केसेसमध्ये फारसे यश मिळाले नसले 

तरी या बाबतीत डॉक्टर खूप आशावादी आहेत. मॅसेच्युसेट्स रुग्णालयातील डॉक्टरांना आशा आहे की, या शस्त्रक्रियेनंतर प्राण्यांच्या जनुकांमध्ये बदल करून माणसांना मदत करता येईल.

एकट्या अमेरिकेत दहा लाखांहून अधिक लोक अवयव प्रत्यारोपणासाठी रांगा लावत आहेत. 

अशा परिस्थितीत प्राण्यांकडून माणसांमध्ये होणारे हे प्रत्यारोपण यशस्वी झाल्यास वैद्यकीय क्षेत्रातील ही विलक्षण कामगिरी ठरेल. यामुळे हजारो लोकांचे प्राण वाचू शकतात.

मात्र, टिमच्या ऑपरेशनबाबत कोणताही अंदाज बांधणे घाईचे ठरेल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. कुठलीही अडचण न येता किडनी किती काळ काम करते हे पाहावे लागेल. 

तथापि, आम्ही आशावादी आहोत आणि लोकांमध्ये ही आशा पसरविण्यास उत्सुक आहोत.

Post a Comment

0 Comments