मोठी बातमी..सांगोल्यात पत्र्याच्या घराला आग लागून संसार उपयोगी साहित्य जळून खाक
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : भर दुपारी अचानकपणे घराला लागलेल्या आगीमध्ये भूईटे वस्ती येथील निराधार शेख कुटुंबियांचे संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले.
आगीचा तांडव आणि धुराचे लोट सुरू असताना पत्रकार सुरज लवटे यांच्या तत्परतेमुळे आणि सांगोला नगरपालिकेचे अग्निशामक वाहन
घटनास्थळी दाखल झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे.
पतीच्या निधनानंतर आईने आधार दिला. आणि स्वतःच्या घराशेजारी मुलीला पत्र्याचे घर बांधून दिले. हातावरचे पोट असल्याने, कराव तवा खावं अशा परिस्थितीचा सामना करत असताना, घराबाहेर काम
धंद्यासाठी गेले असता सांगोला शहरातील भूईटे वस्ती येथील पत्र्याच्या घराला अचानक आग लागली. दरम्यान शेजारी असलेल्या पत्रकार सुरज लवटे यांनी तातडीने नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला संपर्क साधून सदरची घटना घडली असल्याबाबत माहिती दिली.
अग्निशामक दलाचे वाहन घटनास्थळी दाखल होईपर्यंत संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले. दरम्यान आजूबाजूला अनेक कुटुंब वास्तव्यास आहेत. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी वेळेत आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.
सांगोला अग्निशमन विभागाचे चालक संतोष सरगर, फायरमन आसिफ काझी, नाजाकत मुलानी, चालक तानाजी शिंगाडे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
या घटनेमध्ये पत्रकार सुरज लवटे यांनी अग्निशामक दलाला वेळेत माहिती देऊन घटनास्थळी पाचारण केले या निमित्ताने यांचे कौतुक होत आहे.
0 Comments