google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मुस्लिम समाज बांधवांच्या उपोषण स्थळी मा.आ.दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी भेट मुस्लिम समाज बांधवांच्या आंदोलनावर तात्काळ तोडगा काढण्याचा मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांना सुचना

Breaking News

मुस्लिम समाज बांधवांच्या उपोषण स्थळी मा.आ.दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी भेट मुस्लिम समाज बांधवांच्या आंदोलनावर तात्काळ तोडगा काढण्याचा मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांना सुचना

मुस्लिम समाज बांधवांच्या उपोषण स्थळी मा.आ.दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी भेट


मुस्लिम समाज बांधवांच्या आंदोलनावर तात्काळ तोडगा काढण्याचा मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांना सुचना 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला/प्रतिनिधी ः सांगोला शहर व तालुक्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित असून सर्व समाजाचे समाजबांधव गुण्यागोविंदाने राहतात. सांगोला नगरपरिषदेसमोर उर्दू शाळेच्या बाबतीत नगरपालिकेने इतर 

समाजाला उर्दू शाळेची जागा देण्याचा केलेला ठराव रद्द करावा या मागणीसाठी मुस्लिम समाज बांधव उपोषणाला बसले आहेत. या उपोषण स्थळी मा.आ.दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी भेट देवून

 मुस्लिम समाज बांधवांच्या मागण्या जाणून घेतल्या व सांगोला नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.सुधीर  गवळी यांना मुस्लिम समाजाची असलेली उर्दू शाळेच्या जागेवर तात्काळ तोडगा काढावा अशा सुचना दिल्या . 

सांगोला नगरपालिकेच्या समोर तीन दिवसापासून मुस्लिम समाज बांधवांचे उपोषण चालू आहे.  

मुस्लिम समाज बांधवांची जी परंपरेने असलेली जागा आहे. नगरपालिकेमध्ये एखादा जागेचा ठराव करताना त्या जागेचा पूर्व इतिहास व  10-20 वर्षाची तसेच 5-50 वर्षाची वहिवाट  ही पाहणे गरजचेे आहे. त्या जागेची नोंद या ठिकाणी बघायला पाहिजे होते.

 नगरपालिका प्रशासनाने एखाद्या समाजाला जागा देताना सर्व  समाजाला विश्‍वासात घेवून ठराव करून दिले तर जातीय तेढच निर्माण होणार नाही.  सांगोला शहर व तालुक्यात जातीयवाद वाढू देवू नये

 यासाठी अधिकार्‍यांसह राजकीय नेत्यांची ही जबाबदारी आहे. जातीय सलोखा राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. मुस्लिम समाज बांधवांची उर्दू शाळा ही मुस्लिम समाज बांधवांनाच मिळावी 

यासाठी सुरू असलेल्या उपोषणाला मा.आ.दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी भेट दिली. समाजाच्या मागण्या समजून घेतल्या यावेळी मुस्लिम समाज बांधवांनी उर्दू शाळेची जागा ही इंग्रज काळापासून मुस्लिम समाज बांधवांची आहे 

आजही त्या ठिकाणी उर्दू शाळेच्या नावाचे  फलक आहेत. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ही आहे.

 अशातच इतर समाजाला जर ही उर्दू शाळेची जागा दिली तर त्याठिकाणी जातीय तेढ निर्माण होवून वारंवार कायदा व सुव्यवस्था बिघडेल 

त्या समाजाला उर्दू शाळेची जागा देण्याऐवजी दुसर्‍या ठिकाणी दुसरी जागा द्यावी. दुसर्‍या चौकामध्ये त्या समाजाला जागा दिल्यास मुस्लिम समाज बांधवांचा विरोध राहणार नाही व जातीय तेढ निर्माण होणार नाही अशी मागणी केली.

 यावेळी मा.आ.दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी तात्काळ मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी या आंदोलन कर्त्यांच्या मागण्या समजावून घेवून त्यावर तोडगा काढावा अशा सुचना दिल्या.  यावेळी मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होतेे.

Post a Comment

0 Comments