google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात मोटरसायकलची ट्रकला पाठीमागून धडक; मोटरसायकलस्वार तरुण जागीच ठार

Breaking News

सांगोला तालुक्यात मोटरसायकलची ट्रकला पाठीमागून धडक; मोटरसायकलस्वार तरुण जागीच ठार

सांगोला तालुक्यात मोटरसायकलची ट्रकला पाठीमागून धडक; मोटरसायकलस्वार तरुण जागीच ठार


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला तालुका  अनकढाळ टोलनाका येथून जवळच असणार्‍या गणेश नगर येथे शुक्रवार दि. 7 फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता मोटरसायकलस्वाराने पाठीमागून ट्रकला धडक दिल्याने मोटरसायकस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की आकाश तानाजी जाधव, वय वर्ष 23 हा तरुण मोटरसायकल क्रमांक  एमएच 10 बीएस 2432 या मोटरसायकल वरून बेनापुर (ता.खानापुर) या आपल्या गावी जात असताना

 त्याने अनकढाळ टोलनाका येथील गणेश नगर या ठिकाणी  सांगोलाकडून मिरजकडे जाणारा ट्रक क्रमांक एमपी 09-एचएच 5616 या ट्रकला पाठी मागून धडक दिली यात तो जागीच ठार झाला. 

या अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग पोलीस एपीआय मनोज बाबर व राष्ट्रीय महामार्गा गस्त पथक घटनास्थळी दाखल झाले. या वेळी त्यांना हा तरुण जागेवर गतप्राण झालेला दिसून आला. 

या अपघाताची माहिती त्यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली व मयत झालेल्या तरुणास शवविच्छेदनासाठी सांगोला येथे राष्ट्रीय महामार्गाच्या रुग्णवाहिकेमध्ये पाठवून दिले. पुढील तपास सांगोला पोलीस स्टेशन करत आहे.

Post a Comment

0 Comments