सांगोला नगरपरिषदेमार्फत शहरातील भटक्या कुत्र्यांची निर्बीजीकरण मोहिम मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला नगरपरिषदेमार्फत शहरातील भटक्या कुत्र्यांची निर्बीजीकरण मोहिम राबविण्यात आली असून
ज्या नागरिकांच्या भटक्या कुत्र्यांबाबत तक्रारी असतील, त्यांनी नगरपालिकेशी संपर्क साधावा असे आवाहन मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी केले आहे.
सांगोला शहरातील भटक्या कुत्र्यांबाबत सांगोला नगरपरिषदेस जेष्ठ नागरीक संघामार्फत तक्रार प्राप्त झाली होती.
शहरात भटक्या कुत्र्यांमुळे लहान मुले, वयोवृध्द नागरीक यांना त्रास होत असुन त्यांचा बंदोबस्त करावा तसेच भटक्या कुत्र्यांमुळे अपघात घडत असले बाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
त्या अनुषंगाने सांगोला नगरपरिषदेने भटक्या कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी त्यांची निर्बीजीकरण करण्याची मोहिम हाती घेतली
असुन सध्या सदर मोहिमेची तिसरी फेरी सुरु आहे. अशी माहिती आरोग्य निरीक्षक विनोद चंदनशिवे यांच्याकडून देण्यात आली.
सदर मोहिमेअंतर्गत शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडुन निर्बीजीकरण शस्त्रक्रीया करणेपुर्वी तीन दिवस आधी व शस्त्रक्रीया झाल्यानंतर तीन दिवस पशुवैदयकीय तज्ञांच्या देखरेखेखाली ठेवण्यात येते
व त्यानंतर त्यांना रेबीज लस दिली जाते. सदर कालावधीमध्ये पकडलेल्या श्वानांना खानपान, औषधोपचार यांची व्यवस्था केली जाते.
तसेच ज्या भागातुन त्यांना पकडण्यात आलेले असते त्या भागात त्यांना परत सोडण्यात येते. याकामी सांगोला नगरपरिषदेस पशुधन विकास अधिकारी डॉ. अस्लम सय्यद यांचेमार्फत
वेळोवेळी तपासणी व मार्गदर्शन केले जाते. शहरातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या भागातील भटक्या कुत्र्यांबाबत काही तक्रार असल्यास सांगोला नगरपरिषदेतील आरोग्य विभागाकडे संपर्क करावा.
तसेच शहरातील प्राणीमित्रांनी सदर ठिकाणी भेट दयावी व याविषयी काही सुचना असल्यास नगरपरिषदेस कळविण्यात याव्यात असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्याकडुन करण्यात आले.
0 Comments