google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ६ एप्रिलच्या सावंतवाडी येथे होणाऱ्या डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या महाअधिवेशनास सहकार्य करणार! माजी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची ग्वाही

Breaking News

६ एप्रिलच्या सावंतवाडी येथे होणाऱ्या डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या महाअधिवेशनास सहकार्य करणार! माजी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची ग्वाही

६ एप्रिलच्या सावंतवाडी येथे होणाऱ्या डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या



तिसऱ्या महाअधिवेशनास सहकार्य करणार! माजी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची ग्वाही

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

मुंबई - डिजिटल पत्रकारांच्या चळवळीला सदैव पाठबळ देणाऱ्या माजी शिक्षणमंत्री व सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर यांनी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या 

दि.६एप्रिल २०२५ रोजी सावंतवाडी (सिंधुदुर्ग -कोकण)येथील भोसले नॉलेज सिटी येथे होत असलेल्या तिसऱ्या महाअधिवेशनास सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी मुंबईत दिपक केसरकर यांची भेट घेऊन अधिवेशनाचे रितसर निमंत्रण दिले.यावेळी माने यांच्या समवेत कुंदन हुलावळे हे होते.

अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हस्ते होणार आहे.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने  मुख्यमंत्री फडणवीस यांना अधिवेशनाचे निमंत्रण यापूर्वीच दिलेले आहे.देण्यासाठी भेट घेतली.त

सावंतवाडी येथील महाअधिवेशनाचे स्वागताध्यक्षपद सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी तर सहस्वागताध्यक्षपद भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत भोसलें यांनी स्वीकारले आहे.

अधिवेशनाचे सन्माननीय मार्गदर्शक म्हणून माजी शिक्षणमंत्री आ.दिपक केसरकर आहेत.या अधिवेशनाचे निमंत्रण माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे,

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि आ.निलेश राणे यांनी स्वीकारलेले आहे.अधिवेशनाचे संयोजन समितीचे प्रमुख म्हणून संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष सागर चव्हाण

 व सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पारकर हे कार्यरत आहेत.अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध व्यापक समित्या गठित होत असून कोकणातील विविध क्षेत्रातील मान्यवर व मंत्र्यांना निमंत्रित केले जाणार आहे.आज राजा माने व यांनी संघटनेची

 आजवरची वाटचाल व सावंतवाडी येथे होणाऱ्या महाअधिवेशनाच्या कार्यक्रमांची माहिती आ.दिपक केसरकर यांना दिली.अधिवेशनात सहभागी होवून ते यशस्वी करण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाहीही आ.केसरकर यांनी दिली.

Post a Comment

0 Comments