google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहरातील नामांकित बँकेत घोटाळा ; तक्रारदारावर कारवाई करण्याच्या धमक्याला भिक घालणार नाही ; ठेवीदार हातबल ; अनेकजण ठेवीदार ठेवी काढण्याच्या तयारीत

Breaking News

सांगोला शहरातील नामांकित बँकेत घोटाळा ; तक्रारदारावर कारवाई करण्याच्या धमक्याला भिक घालणार नाही ; ठेवीदार हातबल ; अनेकजण ठेवीदार ठेवी काढण्याच्या तयारीत

सांगोला शहरातील नामांकित बँकेत घोटाळा ; तक्रारदारावर कारवाई करण्याच्या धमक्याला भिक घालणार नाही ;


ठेवीदार हातबल ; अनेकजण ठेवीदार ठेवी काढण्याच्या तयारीत 

सांगोला/प्रतिनिधी ः सांगोला शहरातील नामांकित बँकेत प्रचंड प्रमाणात मुख्यकार्यकारी अधिकारी व संचालक मंडळांच्या संगनमताने कोट्यावधी रूपयांची कर्ज प्रकरणे दुसर्‍याच्या नावावर घेवून

 संचालकांनी वापरल्याची तक्रार करण्यात आली असून तक्रार करणार्‍यावर स्वतःला मी खुप हुशार आहे, असा म्हणणारा संचालक कारवाई करण्याच्या धमक्या देत आहे.

 ठेवीदाराच्या ठेवी परत मिळेपर्यंत हा लढा सुरू राहणार असून अशा धमक्यांना व कारवाई ला कोणीही घाबरणार नाही, बॅकेंने जाती-पातीचे राजकरण करू नये असे आवाहनही त्रस्त झालेल्या कर्जदार व सभासदांनी केले आहे.  

50-50 लाख रूपये दुसर्‍याच्या नावावर काढून स्वतः वापरणार्‍या संचालकावर लवकरच गुन्हा दाखल होणार आहे.

 त्या संदर्भातील सर्व पुरावे कर्जदारांनी व सभासदांनी गोळा केलेले आहेत. आयकर विभागाच्या फाईली तयार करून बँकेच्या नावावर दुकान चालविणार्‍या व मी स्वतःला खुप मोठा प्रतिष्ठीत आहे

 असे समजणार्‍या एका संचालकाची व त्याने बँकेत व बँकेबाहेर केलेल्या सर्व पराक्रमाची चौकशी होवून यांना लवकरच जेलची हवा खावी लागणार आहे. अनेकांच्या नावावर बेकायदेशीर कर्ज काढून मॉरगेज न करता स्वतःचा स्वार्थ साधणार्‍या या संधी सादूला हा पैसा स्वतःचा नसून ठेवीदारांचा आहे हे अद्याप लक्षात आलेले नाही

 या व्यक्तीने पुण्यामध्ये काही मालमत्ता घेतल्या आहेत. याचीही चौकशी लवकरच होणार आहे. बँकेत अडचणीत आलेल्या कामगाराला नियमाप्रमाणे कारवाई

 न करता 3-3 महिने जेलची हवा भोगून आल्यानंतर निलंबित करणे गरजेचे असताना केवळ जवळचा म्हणून त्याच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. बँकेत मॉरगेज न करता बोगस कर्ज प्रकरणे वाटप केल्यानंतर अनेकांनी माहितीच्या अधिकारात अर्ज दिले 

परंतू कोणालाही माहिती न देणारा हा विव्दान संचालक स्वतःला माझ्या सारखे कोणीही असे जरी समजत असला तरी लवकरच नागपूर विभागाचे आरबीआय चे पथक या बँकेची सखोल

 चौकशी करून संचालक मंडळ बरखास्त करून गुन्हे दाखल होतील इतक्या तक्रारी आरबीआयकडे गेल्या आहेत. या संचालकांनी तक्रारदारांना ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न सुरू केला असला तरी अशा धमक्यांना कोणीही घाबरणार नाही. 

पुढील आठवड्यापासून रोज एक कर्जदार बँकेसमोर कायमस्वरूपी उपोषणाला बसणार असल्याचे एका कर्जदाराने सांगितले. या बँकेत कर्ज देताना सभासद केले जाते व कर्ज संपल्यानंतर सभासद काढून टाकले जाते. 

मर्जीतीलच सभासद ठेवले जातात. या बँकेने गेली अनेक वर्षे सभासदांना डिव्हीडंड वाटप केला नाही. ठेवीदारांच्या पैशावर डल्ला मारणार्‍या या संचालकावर लवकरच गुन्हे दाखल होतील एवढी कागदपत्रे कर्जदारांकडे उपलब्ध झाली आहेत.  

दिशाभुल करणार्‍या संचालकांचा पर्दापाश होणार... 

सर्वसामान्य ठेवीदार, कर्जदार, खातेदार यांच्याबाबतीत संचालक दिशाभुल करतात वरून किर्तन आतुन तमाशा या युक्तीप्रमाणे बँकेत कामकाज सुरू आहे. 

पत्रकारांचीही दिशाभुल करणार्‍या बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी व संचालक मंडळाच्या विरोधात ठेवीदार, कर्जदार व खातेदार यांचे उपोषण असून या बँकेची आरबीआयने पथके नेमून चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. 

ठेवीदार संभ्रमात..

या बँकेवर ठेवीदारांनी मोठ्या प्रमाणावर विश्‍वास ठेवून, काबाड-कष्ट करून पै-पै गोळा करून कोट्यावधी रूपयांच्या ठेवी ठेवल्या आहेत.

 परंतू संचालक मंडळाच्या मनमानी कर्ज वाटप व थकीत कोट्यावधी रूपयांच्या कर्जामुळे ठेवीदार अडचणीत आले असून अनेक ठेवीदार ठेवी काढून दुसर्‍या बँकेत ठेवत आहेत. 

त्यामुळे कोट्यावधी रूपयांच्या ठेवी इतरत्र बँकेत हलविण्यात आल्याचे समजते. बँकेने खुलासा केला तरी ठेवीदार सुज्ञ आहेत. ठेवीदारांचे भवितव्य अंधारात आहे. त्यामुळे ठेवीदार लवकरच ठेवी काढून सुरक्षित असलेल्या बँकेत ठेवणार असल्याचे सांगण्यात आले आहे.   

क्रमशा ः... 

नामांकित बँकेत महा घोटाळा

Post a Comment

0 Comments